Shivsena Latest Marathi News, Uddhav Thackeray News,
Shivsena Latest Marathi News, Uddhav Thackeray News,  
मुंबई

Shivsena: शिवसेनेतील डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे बॅकफुटवर येणार?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : चाळीस आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेमध्ये मोठी फुट पडली आहे. हे ड्रॅमेज कंट्रोल करण्यासाठी शिवसेनेचे ( पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackery) यांच्यापुढे उभे ठाकले आहे. त्यात भर म्हणजे आमदारांपाठोपाठ खासदारांनीही बंड पुकारण्याचे संकेत दिले आहे. हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे एक पाऊल मागे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Shivsena Latest Marathi News)

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात आज (११ जुलै) मातोश्रीवर सर्व खासदारांची महत्वाची बैठक होणार आहे. शिवसेनेतील डॅमेज रोखण्यासाठी उद्धव ठाकरे राष्ट्रपती निवडणुकीत (president election 2022 ) एनडीएला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या 18 जुलै रोजी देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. या राष्ट्रपती निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात आज 'मातोश्री'वरील बैठकीनंतक शिवसेनेकडून अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे.(Uddhav Thackeray News in Marathi)

दोन-तीन दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंना याबाबत पत्र लिहिले होते. यात त्यांनी भाजपच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंवर खासदारांचाही दबाव वाढल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच आज होणाऱ्या खासदारांच्या बैठकीकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आता शिवसेनेतील डॅमेज रोखण्यासाठी उद्धव ठाकरे एक पाऊल मागे येऊन भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेच्या 19 पैकी 14 खासदारांकडून लोकसभेत स्वतंत्र गटाची मागणी केली जाऊ शकते. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे स्वतंत्र गटाची मागणी करण्यासाठी चौदा खासदार बंड करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त 'द हिंदू' या वृत्तसंस्थेने दिले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 13 किंवा 14 जुलै रोजी खासदारांकडून बिर्ला यांच्याकडे स्वतंत्र गटाची मागणी केली जाऊ शकते, असं वृत्तात म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT