Rajendra Gavit News, Palghar News,  Uddhav Thackeray News, Shivsena News
Rajendra Gavit News, Palghar News, Uddhav Thackeray News, Shivsena News 
मुंबई

उद्धव ठाकरे राष्ट्रपतीपदासाठी भाजप उमेदवाराला देणार पाठिंबा?

सरकारनामा ब्युरो

पालघर : येत्या १८ जुलैला देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने (Shivsena) भाजपच्या (BJP) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी केली आहे. याबाबत राजेंद्र गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं आहे.(Shivsena Latest Marathi News)

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेना खासदार देखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. असे असताना दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी करणारं पत्र उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.(Palghar News in Marathi)

खासदार राजेंद्र गावित हे स्वतः आदिवासी समाजाचे असून ते आदिवासी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने आदिवासी महिला द्रौपदी मुर्म यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती राजेंद्र गावित यांनी उद्धव ठाकरेंना पत्राद्वारे केली आहे.

पत्रात राजेंद्र गावित म्हणतात की, ''स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी माजी राष्ट्रपती महाराष्ट्र कन्या प्रतिभाताई पाटील आणि प्रख्यात अर्थतज्ञ स्वर्गीय प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदासाठी बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याच धर्तीवर उद्धव ठाकरे यांनी राजकीयदृष्ट्या काही जरी असलं तरी मोठं मन करुन तसाच पाठिंबा स्वातंत्र्यानंतर पहिल्या आदिवासी महिलेला मिळालेला या सर्वोच्च पदासाठी द्यावा. उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यास संपूर्ण आदिवासी समाज त्यांच मनापासून स्वागत करेल. मला आशा आहे उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील, अशी आशा देखील गावित यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली.(Rajendra Gavit News)

दरम्यान, खासदारांनी शिंदे गटाच जाण्याच्या चर्चेवरही राजेंद्र गावित यांनी भाष्य केल आहे. खासदार संजय राऊत यांच्याबद्दल बोलणं टाळत ते म्हणाले की, मी सध्या तरी शिवसेनेत आहे. पण पुढे काय होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरें यांच्यावरील खासदारांचा दबाव वाढत चालला असल्याचं दिसत आहे. चाळीस आमदारांच्या बंडामुळे आधीच पक्षाला खिंडार, खासदारांच्या पत्रामुळे उद्धव ठाकरेंवरील वाढता दबाव पाहता ते काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT