मुंबई : महाविकास आघाडीला डच्चू देत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या सत्तांतराच्या चर्चा महाराष्ट्राबरोबरच देशभरामध्ये आजही सुरु आहेत. तर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदेही चांगलेच अॅक्टिव्ह झाले आहेत. मुंबईतील पूर परिस्थिती असो वा दिल्ली दौरा, वारकऱ्यांना मदत जाहीर करणे, फोनवरुन पूर परिस्थितीचा आढावा घेणे, अशा एक ना अनेक गोष्टींमधून ते झळकत असल्याचे दिसत आहे. (Cm Eknath Shinde latest news)
विशेष म्हणजे त्यांचं नातवावरील प्रेमही महाराष्ट्रापासून लपलेले नाही. रविवारी (१८ जुलै) त्यांचा नातू आजारी असल्याने त्यांनी जवळपास चार तास रुग्णालयात घालवल्याचेही महाराष्ट्राने पाहिले. त्यानंतर त्यांचा एका छोट्या मुलीसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकलीने मुख्यमंत्री शिंदेंकडे थेट गुवाहाटीला घेऊन जाण्याचीच मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांचा या चिमुकलीसोबतचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
त्यांच काय झालं की, रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवणच्या विठ्ठलराव जोशी चॅरिटीज आणि ट्रस्ट इंग्लिस मिडीयम स्कूल इथं शिकणाऱ्या अन्नदा डामरे या चिमुकलीने रविवारी शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या बंगल्यावर भेट घेतली. यावेळी अन्नदाने मुख्यमंत्री शिंदेंना विचारलं, “तुम्ही पाण्यात जाऊन पूरग्रस्तांना मदत केली. मी पण पूरग्रस्तांना पाण्यात जाऊन मदत केली तर मला पण मुख्यमंत्री होता येईल का?” यावर मुख्यमंत्री शिंदेंनी या चिमुकलीच्या खांद्यावर हात ठेवत, “हो, होशील की” असं उत्तर दिलं.
त्यानंतर अन्नदा पुन्हा म्हणाली की, “पूर्वी मला फक्त मोदीजी आवडायचे. पण धर्मवीर बघितल्यापासून तुम्ही पण आवडू लागले. पण आता तुम्ही आता रुद्रांशला वेळ कसा देणार?” असा प्रश्न तिने विचारला. त्यावर “मी त्याला भेटायला ठाण्याला जाणार होतो. पण तोच मला भेटायला इकडे आला,” असं उत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं.
शेवटी जाता जाता अन्नदाने मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा एक प्रॉमिसही मागितलं. “येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही आम्हाला गुवाहाटीला फिरायला घेऊन जाणार का?,” असा प्रश्न या चिमुकलीने विचारला. पण हा प्रश्न ऐकताच सर्व उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तर एकनाथ शिंदेंनाही काय बोलावं हेच कळेना. यावर फक्त हसत होकारार्थी मान डोलवली. “कामाख्या मंदिरामध्ये देवीचं दर्शन करायचं ना?” असं मुख्यमंत्री शिंदेंनी विचारलं असताना अन्नदाने होकारार्थी मान डोलवली. शेवटी “फार हुशार आहे,” असं म्हणत तिचा गाल ओढून निघून गेले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.