<div class="paragraphs"><p>Devendra Fadanvis&nbsp;</p></div>

Devendra Fadanvis 

 

Sarkarnama 

मुंबई

Winter Session 2021 पेपरफुटी प्रकरणावरुन फडणवीस सभागृहात आक्रमक

सरकारनामा ब्युरो

मुंबई : दरवर्षी नागपूर येथे पार पडणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला (Winter Session 2021) यंदा पहिल्यांदाच मुंबई (Mumbai) येथे पार पडत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षण, टीईटी, म्हाडा व आरोग्य विभागातील पेपरफुटी प्रकरण, मराठा आरक्षण, शेती नुकसान भरपाई, ड्रग्ज प्रकरण, एसटी महामंडळाचे विलीनीकरण आदी प्रमुख मुद्द्यांवरुन सरकारला घेरायला सुरुवात केली आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी टीईटी, म्हाडा व आरोग्य विभागातील पेपरफुटी प्रकरणावरुन चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. परीक्षा घोटाळा प्रकरणी पहिल्याच दिवशी चर्चा व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. पेपरफुटीबाबत बोलताना फडणवीसांनी परीक्षेचे कॉन्ट्रॅक्ट दिलेली न्यासा कंपनीला 21 जानेवारी 2021 अपात्र ठरविण्यातआली होती. त्यानंतर ते कोर्टात गेले. 4 मार्चला 2021 रोजी त्यांना पात्र करण्यात आले. मग त्यांनाच काम देण्याची गरज काय होती, असा सवालही त्यांनी केला.

या कंपनीला परीक्षेचे काम दिल्यानंतर आधी आरोग्य विभागाच्या परीक्षेत घोळ झाला. त्यानंतर म्हाडा आणि TET परीक्षेत घोळ झाला. त्यानंतर जी. ए. टेक्नोलॉजी पण 22 एप्रिल 2021 मध्ये शासकीय यादीवर आली. पण या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतरही टीईटी परीक्षेत घोटाळा झाला. परीक्षा केंद्रांचा घोळ झाला. दोन पेपरसाठी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्र देण्यात आले. एकेका पदासाठी किती बोली लागली याचे पुरावे आहेत. दोन वेगवेगळ्या दिवशी पेपर झाले, पण पहिल्या दिवशी जो पेपर होता पुन्हा त्याच प्रश्नपत्रिका सातव्या दिवशी देण्यात आल्या. या सरकारच्या काळात एकही परिक्षा घोटाळ्याशिवाय झाली नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

या प्रकरणात ३० कोटींपर्यत घोळ झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. तर प्रश्नपत्रिका पुरवण्याकरता प्रत्येकाकडून सहा ते साडेसहा लाख रुपये घेतले गेल्याचे पुरावे मिळाले आहेत. या घोटाळ्याचे तार मंत्रालयापर्यंत आहेत. संपूर्ण शासकीय यंत्रणा कामात लागली होती का, अशी शंकाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केली. परीक्षेसंदर्भात एवढा मोठा घोटाळा झाला. त्यासंदर्बात चर्चा झालीच पाहीजे, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT