ST Employees : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या घरासमोर आंदोलन केलं म्हणून निलंबित करण्यात आलेले एसटी महामंडळातील 118 कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्यात मोठा दिलासा मिळाला होता. राज्य सरकारने या सर्व कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द केले आहे. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने काल (गुरुवारी) आणखी मोठा निर्णय घेतला आहे. (ST Employees latest news)
शरद पवार यांच्या घरावर आंदोलन केलेल्या एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांवरील खटले मागे घेण्यासाठी निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे. याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. या अंतर्गत राजकीय व सामाजिक आंदोलनातील दाखल झालेले ३० जूनपर्यंतचे खटले मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एकूण आघाडी सरकारच्या शेवटच्या काही महिन्यांतील आंदोलनात दाखल झालेल्या खटल्यांत आंदोलकांवरील खटले शिंदे-फडणवीस सरकारने आज मागे घेण्याचा शासन निर्णय जारी करत मोठा दिलासा दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्यावर्षी आंदोलन केले होते. एसटी कर्मचाऱ्यांनी संपही पुकारला होता. या काळात 10 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. या संपकऱ्यांनी पवार यांच्या घरासमोर प्रचंड निदर्शने करून आपला संताप व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी अनेक आंदोलकांची धरपकड केली होती.
राज्य सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेत एसटीच्या 118 कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्याने सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन गेल्या महिन्यात मागे घेतलं आहे. त्यानंतर सरकारने या कर्मचाऱ्यांना आणखी मोठा दिलासा दिला आहे.
विविध राजकीय आंदोलनातील गुन्हे घेतले मागे राजकीय आंदोलनात दाखल केलेले गुन्हे सर्वसाधारणपणे मागे घेतले जातात. यात आघाडी सरकारच्या काळातही असे गुन्हे मागे घेण्यात आले. याआधी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात दाखल गुन्हेही मागे घेण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.