Dhananjay Munde Latest News, Dhananjay Munde News Today, Woman threatens Dhananjay Munde  sarkarnama
मुंबई

मोठी बातमी : धनंजय मुंडेंना महिलेची धमकी ; बलात्काराची तक्रार दाखल करणार

संबधित महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार केली होती.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात एका महिलेने बलात्काराची तक्रार करण्याची धमकी दिली आहे. संबधित महिला ही इंदूरची असल्याची समजते. तिने मुंडेंकडून पाच कोटींची खंडणी मागितली असल्याची माहिती पोलिसांनी (Mumbai Police) दिली. त्या महिलेच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Dhananjay Munde Latest Marathi News)

दरम्यान धनंजय मुंडे यांनी या महिलेची मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.आपण या महिलेला ओळखत असल्याचे धनजंय मुंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच आपण या महिलेला एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून तीन लाख रुपये दिले असून एक मोबाईल कुरिअरच्या माध्यमातून पाठवला होता,'' असे धनजंय मुंडे यांनी म्हटले आहे. त्यानंतर या महिलेने बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी मुंडेंनी दिली आहे.

संबंधित प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलिस करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंवर त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनी देखील आरोप केले होते. शर्मा यांनी मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. पत्रकार परिषदेत करुणा शर्मा यांनी मुंडेंवर गंभीर आरोप केले होते. पण, मुंडे यांनी वेळीच स्पष्टीकरण देत त्या माझ्या पत्नी असल्याचं सांगितलं होतं.

आंतरराष्ट्रीय नंबरवरुन या महिलेने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात धनंजय मुंडे यांना फोन करुन ५ कोटी रुपये किंमतीचे दुकान व महागड्या मोबाइलसाठी तगादा लावला होता. तसंच जर मागण्या पूर्ण न केल्यास सोशल मिडियावर (Social Media) बदनामी करण्याची धमकी दिली होती, पून्हा गुन्हा दाखल करण्याची धमकीही महिलेने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करीत आहेत.काही दिवसांपूर्वी संबधित आरोपी महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार केली होती. पण, काही दिवसानंतर ही तक्रार मागे घेण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT