World Cup 2023 news  Sarkarnama
मुंबई

World Cup 2023 : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची रोहित पवारांनी काढली समजूत ; आपणही जरुर या..

सरकारनामा ब्युुरो

Anil Deshmukh On World Cup Schedule: यंदा भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे (ODI World Cup 2023) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी (27 जून) वेळापत्रक जाहीर केले आहे.

५ ऑक्टोबर 2023 ते 19 नोव्हेंबर 2023 दरम्यान ही विश्वचषक स्पर्धा होत आहे. या स्पर्धेतील एकही सामना नागपूरमध्ये ठेवण्यात न आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टि्वट करीत नाराजी व्यक्त केली होती.

या वेळापत्रकावरुन संयोजक आणि अनिल देशमुख असा 'सामना'रंगण्याचे चित्र होते. पण या राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार रोहित पवार यांनी आयसीसीच्या नियमावलीचा सांगत देशमुखांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. रोहित पवारांनी टि्वट करीत देशमुखांना सामना पाहण्याचे निमंत्रण दिले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट बीसीसीआय सचिव जय शहा आणि अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली. नागपूरला एकही सामना न दिल्याबद्दल विदर्भाची नाराजी पत्राद्वारे यांनी कळवली. रोहित पवारांनी टि्वट करीत देशमुखांना या सामन्याच्या वेळापत्रकाविषयी माहिती दिली आहे.

"विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांच्या आयोजनामध्ये नागपूरकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अत्यंत निराश झालो आहे. नागपूरमध्ये जागतिक दर्जाच्या स्टेडियमपासून सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. क्रिकेट प्रशासनाने मुंबई आणि पुण्याच्या पलीकडे जाऊन विदर्भाचाही विचार करायला हवा. त्याच्याकडे आता दुर्लक्ष करू नये. नागपुरमध्येही काही सामन्यांचे आयोजन करावे, अशी मी बीसीसीआयला विनंती करतो," असे टि्वट देशमुखांनी केलं आहे.

"आपण विदर्भाची बाजू घेणे योग्यच आहे, पण खेळात कोणताही भेदभाव केला जात नाही. विदर्भात सामने होणार नसल्याची आपली नाराजी असली तरी आयसीसीच्या निकषांप्रमाणे 6 किंवा 8 ठिकाणीच सामने व्हायला पाहिजेत. पण आज बीसीसीआयने केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे राज्यात प्रत्यक्ष 10 ठिकाणी सामने तर 2 ठिकाणी सराव असे एकूण 12 ठिकाणी सामने होणार आहेत," असे रोहित पवारांनी टि्वट मध्ये म्हटलं आहे.

रोहित पवार म्हणतात..

देशातील स्टेडियमच्या संख्येचा विचार करता, काही राज्यांवर नक्कीच अन्याय झाला असेल; पण महाराष्ट्रात सर्वाधिक सामने होणार असल्याने याबाबत मी बीसीसीआय आणि आयसीसीचे महाराष्ट्राच्यावतीने आभारही मानले आहेत. हे सामने पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र येणार असून आपणही जरुर या..

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT