Ganga Vilas River Cruise News  sarkarnama
मुंबई

Ganga Vilas River Cruise News : मोदींच्या गंगा विलास रिव्हर क्रूझला 'या' राज्यांची आडकाठी

Ganga Vilas River Cruise News : आसाम या राज्यातून प्रवास करत पुढे ती बांगलादेशमध्ये सुद्धा प्रवेश करणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Ganga Vilas River Cruise News : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकतेच एमव्ही गंगाविलास रिव्हर क्रूझचे उद्धघाटन झाले आहे. शुक्रवारी ३२ प्रवाशांना घेऊन हे जहाज प्रवाशाला रवाना झाले आहे. (Ganga Vilas River Cruise latest News)

क्रूझ ५० पर्यटनस्थळांसह २७ वेगवेगळ्या नद्यांतून जाईल. पण या क्रूझला उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी विरोध केला आहे, तर बिहारमध्येही या जहाजाला विरोध होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

या क्रूझमध्ये जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रीय उद्याने, नदी घाट आणि बिहारमधील पाटणा, झारखंडमधील शाहिगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता या प्रमुख शहरांसह ५० पर्यटन स्थळांचा समावेश असेल. आसाम या राज्यातून प्रवास करत पुढे ती बांगलादेशमध्ये सुद्धा प्रवेश करणार आहे.

गंगा नदीच्या किनाऱ्यावर नागरिकांच्या उपजीविकेचे साधन ठरणाऱ्या या क्रूझच्या माध्यमातून संबधित परिसरातील पर्यटन क्षेत्रांचा विकास होणार आहे. यासाठी त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मोदींना यात सहकार्य देण्याचे आवाहन केले आहे.

उत्तरप्रदेशात भाजपाची सरकार असली तरी येथील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्याला विरोध केला आहे. त्यांनी या क्रूझबाबत आरोप केला आहे. "वाराणशी सारख्या पवित्र तीर्थ स्थळाला पर्यटनस्थळ करण्याचा भाजपचा डाव आहे, " असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.

जनता दल यूनाटेड (जदयू)चे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनीही विरोध केला आहे. गंगा नदीची स्वच्छता करण्याच्या नावावर मोदी सरकार जनतेचा पैसा वाया घालवत आहेत. आमचा या क्रूझला विरोध आहे. आम्ही बिहारमध्ये या क्रूझला विरोध करणार, असा इशारा ललन सिंह यांनी दिला आहे. क्रूझच्या उद्धघाटन कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे गैरहजर होते. पण त्यांना याबाबत आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.

क्रूझमध्ये पंचतारांकित हॉटेलसारख्या सुविधा आहेत. हे नद्यांत जगातील सर्वात लांब प्रवासासाठी जाणारे क्रूझ आहे. ३,२०० किमीचा प्रवास ५१ दिवसांत पूर्ण करेल. क्रूझ रवाना झाले. क्रूझ ५० पर्यटनस्थळांसह २७ वेगवेगळ्या नद्यांतून जाईल

संपूर्ण मार्गाचे भाडे प्रतिव्यक्ती ५० ते ५५ लाख रुपये आहे. १८ लक्झरी सूट्स. स्पा, सलून, आयुर्वेदिक मसाज, स्विमिंग पूल आदी, ३६ प्रवाशांच्या पाहुणचारासाठी ४० जणांचा स्टाफ सज्ज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT