सातारा : सातारा पालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर सुमारे वर्षभरापूर्वीच अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिव्याचे काम डीपीडीसीमधून मंजूर झाले व पोल सुद्धा उभे राहिले होते. फक्त विद्युत कनेक्शन नसल्याने पथदिवे सुरु नव्हते. मात्र, सत्ताधाऱ्यांना कनेक्शन घेऊन प्रकाश पाडण्यासाठी वर्ष लागले. यात सत्ताधाऱ्यांचे कौतुक म्हणावे की सातारकारांचे दुर्दैवं म्हणावे, असा खोचक सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. सातारा पालिकेची निवडणूक जवळ आली, त्यामुळे नेत्यांकडून विकासकामांच्या घोषणांचा पाऊस पडणारच, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. A year later, 'Prakash' fell from Satara Municipality; Rain of announcements ahead of the election-ub73
गेल्या साडेचार वर्षात सातारा पालिकेत कमिशन, टक्केवारी आणि टेंडरसाठी सत्ताधारी नगरसेवकांमध्ये अनेकदा कळवंडी झाल्या. एकमेकांचे गळे धरले गेले. मात्र, त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करून नेत्यांनी आता निवडणुकीचा बिगुल वाजल्याचे लक्षात येताच नुसत्या घोषणांचा पाऊस पाडण्याचा सपाटा सुरु केला आहे, असे स्पष्ट करून शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले की, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. सातारकरांचे काहीही देणेघेणे नसणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी राजकीय स्वार्थ डोळ्यापुढे ठेवूनच 'खोटं बोल पण रेटून बोल' हा नेहमीचा पायंडा सुरु ठेवला आहे.
हद्दवाढ झाल्यानंतर वर्षभरापूर्वीच अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिव्याना जिल्हा नियोजनमधून मंजुरी मिळाली होती आणि सगळं काही उभं राहिलं होत पण, सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आणि खाबुगिरीमुळे कनेक्शन घ्यायला त्यांना वेळ मिळाला नाही आता पालिकेची निवडणूक आली म्हणून नेत्यांच्या डोक्यात 'प्रकाश' पडला आणि वर्षांनंतर का होईना पथदिव्याचे कनेक्शन घेऊन रस्त्यावर त्याचा प्रकाश पाडला गेला, हे उद्योग न कळण्याइतपत सातारकर दुधखुळे नाहीत.
आवश्य वाचा : मुंख्यमंत्री अन् गृहमंत्र्यांकडून पोलिसांना खुली सूट दिल्यानंच अंडरवर्ल्ड कंट्रोलमध्ये!
निसर्गनियमानुसार आता परतीच्या पावसाला सुरवात होणार आहे. त्याच पद्धतीने निवडणूक म्हटलं की सत्ताधारी नेत्यांकडून विकासकामांच्या घोषणांचा पाऊसही सुरु होणार, हे सातारकरांनाही चांगलेच पाठ झाले आहे. न केलेल्या आणि न होणाऱ्या विकासकामांच्या घोषणांचा पाऊस पडून नारळ फुटणार याची तयारी सत्ताधाऱ्यांबरोबर सातारकरांनी सुद्धा केलेली आहे. गेल्या साडेचार, पावणेपाच वर्षात पालिका भ्रष्टाचाराने धुवून निघाली. आता दोन चार महिन्यात आणखी किती 'प्रकाश' पडतोय हेच सातारकरांना बघावे लागेल, असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.