Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

‘मातोश्री’कडे येण्याची कोणी हिंमत करणार नाही, तुम्ही आता घरी जा : ठाकरेंची शिवसैनिकांना सूचना

आम्ही राणांना धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका त्यांनी कायम ठेवली. वेळ पडली तर दुसऱ्या दिवशीही आम्ही `मातोश्री`बाहेर थांबू, अशा प्रतिक्रिया या वेळी शिवसैनिकांनी दिल्या.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ‘‘तुम्ही कृपा करून सगळ्या जणी घरी जा. इकडे ‘मातोश्री’कडे (Matoshri) येण्याची कोणी हिम्मत करणार नाही. तुम्ही दिवसभर इकडे आहेत, त्यामुळे तुम्ही आता आपापल्या घरी जावा,’’ अशी सूचना शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिक (Shiv Sainik) आणि महिला आघाडीच्या कार्यकर्तींना केली. (You go home now : Chief Minister Uddhav Thackeray's instructions to Shiv Sainiks)

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे सांगितले होते, त्यामुळे शिवसैनिकांनी आज मातोश्रीबाहेर दिवसभर गर्दी केली होती. या वेळी शिवसेना नेते आणि शिवसैनिकांनी राणा दांपत्याला धडा शिकविण्याची भाषा केली. राणा यांनी उद्या सकाळी नऊ वाजता मातोश्रीत येऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुपारी `मातोश्री`वर आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना हात जोडून नमस्कार केला. रात्री आठच्या सुमारास मुख्यमंत्री हे पुन्हा वर्षाकडे जाण्यास निघाले. तेव्हा त्यांनी शिवसैनिकांना घरी जाण्यास सांगितले. तुम्ही दिवसभर येथे थांबला आहात. आता आपापल्या घरी जा, असे आवाहन त्यांनी केले. मात्र त्यांचे आवाहन शिवसैनिकांनी मानले नाही. साहेब, आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. आम्ही राणांना धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका त्यांनी कायम ठेवली. वेळ पडली तर दुसऱ्या दिवशीही आम्ही `मातोश्री`बाहेर थांबू, अशा प्रतिक्रिया या वेळी शिवसैनिकांनी दिल्या.

राणा दांपत्यास खारमध्येच रोखणार

मातोश्रीवर उद्या सकाळी येऊन हनुमान चालिसाचे पठण करण्याचा इशारा देणाऱ्या राणा दांपत्यांना त्यांच्या खार येथील घरासमोर रोखण्याचा इशारा शिवसैनिकांनी केला आहे. राणा दांपत्यास मातोश्रीजवळ पाऊलही ठेवू दिला जाणार नसल्याचे शिवसैनिकांनी स्पष्ट केले. त्यासाठी त्यांनी रात्रभर राणा यांच्या घरासमोरच ठिय्या मांडणार असल्याचे सांगितले. शिवसैनिकांनी राणा दांपत्याच्या घराबाहेर टाळ मृदंग आणून भजन करण्यास सुरुवात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT