Aditya Thackeray and Uddhav Thackeray
Aditya Thackeray and Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Varun Sardesai : ठाकरेंचे निकटवर्तीय चौकशीच्या फेऱ्यात; युवासेनेच्या 'या' पदाधिकाऱ्याची होणार चौकशी

सरकारनामा ब्यूरो

Varun Sardesai : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) हे चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण भाजप आमदार योगेश सागर यांनी वरुण सरदेसाई यांच्या चौकशीची मागणी केली आहे. वरुण सरदेसाई यांनी मुलांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

मुलांची फसवणूक केल्याप्रकरणी वरुण सरदेसाई यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार योगेश सागर यांनी विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता वरुण सरदेसाई अडचणीत येण्याची शक्यता आहे.

भाजप आमदार योगेश सागर यांनी वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. सरदेसाई यांनी बनावट संस्था स्थापन करून तरुणांना रोजगार देण्याचे आमिष दाखवत प्रत्येकाकडून 10-10 लाख रुपये उकळल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल, असं सांगत या सर्व प्रकरणाची चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियान प्रकरणाबाबत गंभीर आरोप करण्यात आले. त्यानंतर दिशा सालियान प्रकरणात एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले. तर आता आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय वरुण सरदेसाई यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आलेत. त्यामुळे ते देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT