राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहेत. पालघरच्या पंचायत समितीचा निकाल नुकताच हाती आला आहे. पालघरच्या पंचायत समितीत सावरा एम्बुरमध्ये शिवसेनेने आपला झेंडा फडकवला असून शिवसेनेच्या विनया पाटील बहूमताने निवडूण आल्या आहेत. पालघर जिल्हा परिषदेत 15 तर पंचायत समितीच्या 14 जागांसाठी मतदान पार पडले होते. तर जिल्ह्यात 65% मतदान झाले होते.
विनया विकास पाटील 56576 मतांनी विजयी झाल्या आहेत. तर भाजपच्या सुवर्णा सांबरे यांना 2477 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या कविता पाटील यांना 353 मतांवर समाधान मानावे लागले. बहुजन विकास आघाडीच्या प्रांजल पाटील यांना 2941 मते मिळाली आहेत. माकपच्या प्रतिभा गजानन भुयाळ यांना 956 मते मिळाली आहेत.
दरम्यान, पालघरसह धुळ्याचेही निकाल हाती आले आहेत.गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakat Patil) यांची कन्या धरती देवरे (Dharti Deore) धुळे मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. तर कॉग्रेसने आपले खातं उघडले आहे. नंदूरबार काँग्रेस ने खाते उघडले, म्हसावद गटातून काँग्रेस च्या हेमलता शितोळे विजयी झाल्या आहेत. हेमलता शितोळे 2934 मतांनी विजयी झाल्या आहेत. नंदुरबार कोळदा गटातून भाजप आमदार डाँ. विजयकुमार गावित यांच्या कन्या सुप्रिया गावित या 1326 मतांनी विजयी झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.