Eknath shinde Thapa
Eknath shinde Thapa Sarkanama
मुंबई

चंपासिंग थापा विकला गेल्याच्या आरोपावर शिंदेचं प्रत्युत्तर, 'हा नेपाळी बांधवाचा अपमान..'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखे राहिलेले सेवक चंपासिंह थापा यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला होता. यावर कालपासून राजकिय प्रतिक्रीया उमटत होत्या. आता शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. थापा हा पैशाने विकला गेलेला माणूस आहे. (Latest Marathi News)

पैसे घेऊन थापाने शिंदे गटात प्रवेश केल्याचा आरोप, सावंत यांनी केला होता. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे म्हणाले,"थापा हा पैशाने विकला जाणारा नाहिये." त्यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री शिंदे यांनी निषेध व्यक्त केला आहे. या आरोपांमुळे समस्त नेपाळी बांधवांचा अपमान झालाय, असं देखील शिंदे म्हणाले.

थापा यांनी दिर्घकाळापासून मातोश्रीवर राहून बाळासाहेबांची सेवा केली होती. ते सावलीसारखे बाळासाहेबांच्या सोबत राहिले. थापा यांचा शिंदे गटातील प्रवेश शिवसैनिकांसाठी धक्कादायक ठरला. थापा यांनी आपण शिंदे गटात का सामील झालो, याचे कारण सांगितले. मला बाळासाहेबांचे विचार पटतात. एकनाथ शिंदे यांचेही विचार आपल्याला पटतात. माझ्या मनाचा कौल मी मान्य केला. त्यामुळेच आज मी शिंदे गटात आलो आहे, असे चंपासिंह थापा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT