29 foreigners found in nagar present at markaz in delhi
29 foreigners found in nagar present at markaz in delhi 
नगर

नगर हादरले : `त्या' 29 जणांची दिल्लीतील मरकझला उपस्थिती

सरकारनामा ब्युरो

नगर : जिल्ह्यातील जामखेड, नेवासे येथील मशिदीमधून ताब्यात घेतलेले परदेशी नागरिक दिल्लीतील मरकझला उपस्थित राहल्याचे समोर आले आहे. तेथून कोरोनोची लागन झाल्याने या नागरिकांमुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परदेशी नागरिकांची माहिती दडविल्याच्या कारणाने नेवासे, भिंगार, जामखेड येथील पोलिस ठाण्यात स्थानिकांवर गुन्हे दाखल झाले असल्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी सांगितले.

ताब्यात घेतलेल्या या सर्व लोकांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्यांच्या संपर्कात हजारो लोक आले आहेत. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.

फान्स आणि आयव्हरी कोस्टमधील धर्मगुरुंमुळे जामखेडमधील तीन स्थानिक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या नगरमध्ये आठवर पोचली. या आठपैकी जामखेडमधीलच तीन स्थानिक व्यक्ती व तेथेच सापडलेले दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे जामखेडमध्ये अजून किती जणांना कोरोनाची बाधा झाली, याबाबतचे अहवाल येणे बाकी आहे. दिल्लीतून आलेल्या धर्मगुरूंच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध पोलिस घेत आहेत. ते जेथे थांबले तेथील लोकांची माहिती घेवून त्यांना वेगळे करण्यात येत आहे. 

दरम्यान, परदेशातून 29 लोक जिल्ह्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यात आतापर्य़ंत आठजण कोरोनाबाधीत असून, त्यापैकी एक बरा होऊन त्याला घरी पाठविले आहे. दिल्लीतील मर्कसवरून 29 लोकांसह इतर अकरा लोकांचीही यादी मिळाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT