Anuradha_Nagwade
Anuradha_Nagwade 
नगर

हर्षवर्धन पाटील, डाॅ. सुजय विखे, अनुराधा नागवडेंचे बंद खोलीत खलबते !

संजय आ. काटे

श्रीगोंदे (नगर)  : दिवंगत काँग्रेस नेते शिवाजीराव नागवडे यांच्या पहिल्याच स्मृतीदिनानिमित्त काँग्रेस आघाडी फोडण्यासाठी रणनिती आखली गेली. कार्यक्रमाला आलेल्या माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खासदार सुजय विखे पाटील यांना सोबत घेत नागवडे कुटुंबाशी बंद खोलीत राजकीय चर्चा केली. 

हर्षवर्धनपाटील यांनी भाषणात नागवडे यांनी वेगळा विचार करण्यावर भर दिला होता. अनुराधा नागवडे यांचे लोकसभेसाठी नाव चर्चेत होते . शिवाजीराव बापु यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त झालेला कार्यक्रम हा राजकीय कोपरखळ्या, पक्षबदलाचे संकेत व नेत्यांची बंद खोलीतील चर्चेने गाजला.

 योगिराज महाराज पैठणकर यांनी बापुंच्या कार्याची व्याप्ती मोठी असून, या नेत्याला तालुक्यातच नव्हे, राज्याच्या राजकारणात मान होता, असे सांगितले.
 

त्यानंतर आमदार राहुल जगताप यांनी बापुंमुळे ते आमदार असल्याचे सांगितले. 

माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी बापुंच्या कामाचा गौरव करतानाच सध्या कोण कुठे पळतय, हे समजत नसून मध्यंतरी गायब झालेले हर्षवर्धन पाटील आज येथे सापडल्याचा थेट टोला मारला. 

त्यावर पाटील यांनी ते कायम रिचेबल असतात, असे सांगत बापुंसाठी भरीव योगदान देण्यासाठी वेगळा विचार करावा. त्यासाठी विखे पाटील ते मुख्यमंत्री असा प्रयत्न करावा लागेल, असे सांगत नागवडे यांना भाजपात प्रवेश करण्याचे सुचवले.

दरम्यान, पाटील, खासदार डाॅ. विखे पाटील, राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे यांनी बंद खोलीत तासभर चर्चा झाली. बैठकीत चर्चेचा तपशील समजला नसला तरी, पाटील व विखे पाटील यांनी आघाडी फोडण्यासाठी रणनिती आखली असे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT