balasaheb thorat-selfie
balasaheb thorat-selfie 
नगर

बाळासाहेब थोरातांना सेल्फीचा मोह आवरला नाही...

सरकारनामा ब्यूरो

संगमनेर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आज त्यांच्या गावात, जोर्वे येथे गावकऱ्यांनी जंगी स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्‍यांची आतषबाजी करत थोरात यांची सपत्नीक मिरवणूक काढली. घरोघरी गुढ्या उभारून सडा-रांगोळी करण्यात आली होती.

ग्रामस्थांनी स्वागतासाठी काढलेल्या मिरवणुकीत पत्नीसमवेत "सेल्फी' काढण्याचा मोह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही आवरता आला नाही

सत्काराला उत्तर देताना थोरात म्हणाले, ""जन्मभूमी असलेल्या गावाची संस्कृती व संत सावलीतील संस्कार मी जपले आहेत. प्रत्येकाच्या सुख-दु:खात सहभागी होण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील विविध पदांवर काम करताना तालुक्‍यातील जनतेने दिलेले भरभरून प्रेम कायम हृदयात आहे.''

जोर्वे ग्रामस्थांनी प्रेरणा दिनानिमित्त झालेल्या कुस्ती स्पर्धेत सुमारे 250 पहिलवानांनी भाग घेतला. यात युवराज चव्हाण विजेता ठरला. पारितोषिक वितरणासाठी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, कांचन थोरात, इंद्रजित थोरात, रणजितसिंह देशमुख, सुनंदा जोर्वेकर, सुरेश थोरात, रामहरी कातोरे, सरपंच रवींद्र खैरे, डॉ. सी. के. मोरे आदी उपस्थित होते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT