babanrao pachpute 
नगर

श्रीगोंदे पंचायत समिती निवडीत भाजपत फूट? : राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी फ्रंटफूटवर

संजय काटे

श्रीगोंदे  : श्रीगोंदा पंचायत समितीच्या येत्या मंगळवारी होणाऱ्या सभापती व उपसभापती निवडीत काठावरच्या बहुमतात असणाऱ्या सत्ताधारी भाजपाला धक्का बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यांचा गटनेता अपात्र ठरला असतानाच आता एक सदस्य विरोधी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या गळाला लागल्याने समितीत सत्ता राखणे भाजपाला कठीण झाले आहे.

मंगळवारी पंचायत समितीच्या नव्या सभापती व उपसभापतीची निवड होत आहे. अडीच वर्षांपुर्वी झालेल्या निवडणूकीत माजीमंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने बारा पैकी सात जागा जिंकून काठावरची सत्ता मिळवली. मात्र गेल्या आठवड्यात त्यांचे गटनेते अमोल पवार हेच जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याप्रकरणी अपात्र ठरले. त्यामुळे व्हिप बजावयाला गटनेता आज तरी नसल्याने सदस्यांना मोकळीक मिळाली आणि याचाच फायदा उठवित माजी आमदार राहूल जगताप व सदस्य अण्णा शेलार यांनी भाजपाचा एक सदस्य फोडल्याची चर्चा आहे. जेष्ठ नेते बाबासाहेब भोस यांना मानणारे हे सदस्य असल्याचे बोलले जाते.

अनुसूचित जातीसाठी आरक्षीत असणाऱ्या सभापती पदावर भाजपाचे नानासाहेब ससाणे व राष्ट्रवादीच्या गीतांजली पाडळे हे दोन दावेदार आहेत. दोन्ही गट सत्ता घेण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच काही जण उपसभापतीसाठी इच्छूक झाले आहे. त्यामुळे अजूनच रंगत वाढली आहे.

दरम्यान काँग्रेस आघाडीचीही गटनोंदणी झालेली नसल्याने त्यांनी एक सदस्य फोडला असला तरी त्यांचेही सदस्य संपर्कात असल्याचे भाजपचे नेते सांगत आहेत. अनेक सदस्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत गु्प्त मतदान घेता येईल का ? याची चाचपणी सुरु केल्याने या निवडीत मोठा घोडेबाजार होण्याचीही शक्यता असल्याने सध्या काँग्रेस आघाडी प्रबळ वाटत असली तरीही एनवेळी काहीही होवू शकते असाही जाणकारांचा अंदाज आहे.

विखे पाटील गटावर समितीची सत्ता ठरणार..
समितीत असणाऱ्या सदस्यांमध्ये अण्णा शेलार, रजनी देशमुख, जिजाबापु शिंदेहे सदस्य माजीमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांचे नेतृत्व मानतात. हे तिन्ही सदस्य सध्या काँग्रेस आघाडीसोबत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विखेपाटील गटावर निवडीचे भवितव्य अवलंबून असल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT