centre trying to lable movements as naxalite observes balasaheb thorat
centre trying to lable movements as naxalite observes balasaheb thorat 
नगर

चळवळींना नक्षलवादी ठरविण्याचा केंद्र सरकारचा डाव

सरकारनामा ब्युरो

संगमनेर ः एल्गार परिषदेचा तपास एनआयए संस्थेकडे देण्याची घाई पाहता, पुरोगामी, दलित, आंबेडकरीवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचे यातून स्पष्ट दिसत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. संगमनेरमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

ते म्हणाले, कवी, साहित्यिक, विचारवंतांसाठी पुरोगामी विचारांचे व्यासपीठ असलेल्या एल्गार परिषदेत यांनी आपले विचार मांडले. सत्ताधारी पक्षाच्या विचारधारेविरोधात विचार मांडले म्हणून त्यांच्यावर कारवाई करणे चुकीचे आहे. हा पुरोगामी, आंबेडकरवादी विचार दाबण्याचा प्रयत्न आहे. या बाबत कोणी केलेली आगळीक किंवा त्यांच्या विरोधात काही पुरावे असल्यास आम्ही त्यांचे समर्थन करणार नाही. मात्र एकूणच ज्या प्रकारे घाई गडबडीत हा तपास केंद्रीय संस्थेकडे दिला, त्याची वेळ काळ पाहता यात काळेबेरे असल्याचा संशय बळावला असून, हा प्रकार संशयास्पद वाटतो.

यापूर्वी पुरोगामी विचारांच्या दाभोळकर, पानसरे यांच्या हत्या करून त्यांचे विचार संपवण्याचा प्रयत्न झाला. आता केंद्रातील भाजप सरकार पुरोगामी, आंबेडकरवादी विचार मांडणाऱ्या एल्गारवर कारवाई करुन या विचारांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न करीत आहे. याबाबत देशभरातून चिंता व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT