dhiraj-dheshmukh
dhiraj-dheshmukh  
नगर

सर्वाधिक प्रेम कोणावर? अमित की रितेश देशमुख?

सरकारनामा ब्युरो

संगमनेर : महाराष्ट्रातील विलासराव देशमुख यांचे तीन्ही चिरंजीव वलयांकीत आहेत. दोन राजकारणात तर एक सिनेसृष्टीत असल्याने ते वलय आणखीच विस्तारले आहे. तीनही भावंडांचा एकमेकांवर फार जीव आहे. रितेश सिनेमात असल्याने सर्वांच्या परिचयाचे आहेत. तर धीरज ही धाकटी पाती. तेही आता राजकारणात आले आहेत. त्यांच्या प्रचारात थोरले बंधू अमित आणि मधले बंधू रितेश हेही सक्रिय होते. या तिन्ही भावंडांनी प्रचारात केलेली भाषणे लोकप्रिय झाली. तीनही भावंडांचे एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. मात्र, धीरज यांनी जीवाच्या भावाबद्दल जाहीर खुलासा केला आहे. तो भाऊ नेमका कोण आहे?

संगमनेरला युवा संवाद
संगमनेर येथे युवा संवाद हा कार्यक्रम झाला. त्यात मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, झिशान सिद्धीकी हे सहभागी झाले होते. त्यांची मुलाखत गायक अवधूत गुप्ते यांनी घेतली. त्यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना धीरज यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

गुप्ते यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर धीरज म्हणाले, रितेश आणि अमित यांच्यापैकी रितेशवर जास्त प्रेम आहे. महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संगमनेरमध्ये संवाद साधण्यात आला.

धीरज देशमुख यांना विचारलेले रॅपिड फायर
1. सर्वाधिक प्रेम कोणावर? अभिनेता रितेश देशमुख की वैज्ञकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
उत्तर - रितेश देशमुख

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT