नगर

परिवहनमंत्री रावतेंच्या हस्ते छावण्यांमधील शेतकऱ्यांना धान्यवाटप

सरकारनामा ब्युरो

नगर : दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार मिळावा, यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते आज नगर तालुक्यातील छावण्यांमधील शेतकऱ्यांना धान्य वाटप करण्यात आले.

रावते यांनी अकोळनेर, खंडाळा येथील छावणीला भेट दिली. ते म्हणाले, छावणीतील जनावरांच्या चारा रकमेत वाढ करण्यात आली आहे. तसेच आचारसंहिता संपल्यानंतर धान्य वितरण करण्यात येत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला १० किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो डाळ असे धान्य वितरीत करण्यात येत आहे. 

विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, माजी आमदार अनिल राठोड, संदेश कार्ले यांनी परिवहनमंत्री रावेत यांना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी मागणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT