श्रीरामपूर (जि. नगर) : आक्रमक स्वभावाचे म्हणून परिचित असलेले श्रीरामपूरचे माजी आमदार भानुसाद मुरकुटे एेनवेळी काय करतील, ते सांगता येत नाही. वयाच्या ७५ वर्षे पुर्ण केलेले मुरकुटे तरुणांना लाजवील, असा व्यायाम करतात.
सोमवारी तर त्यांनी कमालच केली. भोकर येथील बंधाऱ्याचे जलपूजन केल्यानंतर त्यांनी थेट बंधाऱ्यातच उडी घेतली. पाण्याचा मोह न आवरल्याने चक्क पोहण्याचा आनंद घेतला. या त्यांच्या कृतीने उपस्थितांनी तोंडात बोट घातले.
गोदावरी नदीकाठचे कमलापूर (ता. श्रीरामपूर) हे मुरकुटे यांचे मूळ गाव. मुरकुटे २१ नोव्हेंबरला वयाची ७५ वर्षे पूर्ण करून ७६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. आजही ते रोज दोन तास व्यायाम करतात. सकाळी उठून सायकल प्रवास करून बोरावके महाविद्यालयाच्या मैदानावर फिरतात. त्यांच्या घरातच व्यायामाचे साहित्य आहे. फिरून आल्यावर घरी एक तास व्यायाम करतात. अनेक वर्षांपासून त्यांचा हा नित्यक्रम आहे.
तालुक्यातील भोकर येथील माणिकदेव येथील बंधाऱ्याचे जलपूजन सोमवारी सकाळी मुरकुटे यांच्या हस्ते व ज्येष्ठ नेते अण्णासाहेब चाैधरी यांच्या उपस्थितीत झाले. अशोक कारखान्याचे अध्यक्ष दिगंबर शिंदे, सरपंच दत्तात्रेय आहेर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
जलपूजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर लगेचच मुरकुटे यांनी कपडे काढले. उपस्थितांना ते काय करतात हे कळण्याच्या आत त्यांनी बंधाऱ्याच्या पाण्यात उडी घेतली. त्यांनी बराच वेळ पोहण्याचा आनंद घेतला. या वयातही ते चांगले पोहू शकतात, हे पाहून उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांची ही कृती तरुणांना प्रेरणादायी ठरणारी आहे .
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.