ex mla snehlata kolhe performs zumba dance
ex mla snehlata kolhe performs zumba dance 
नगर

झुम्बा डान्समध्ये स्नेहलता कोल्हेंनी धरला ठेका 

सरकारनामा ब्युरो

कोपरगाव (नगर) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे व त्यांच्या स्नुषा व संजीवनी महिला बचतगटाच्या रेणुका कोल्हे यांनी संगीताच्या तालावर ठेका धरला. त्यांच्या झुम्बा डान्सने महिलांचे लक्ष वेधून घेतले.

कोल्हे म्हणाल्या, "जागतिक स्तरावर सर्वच क्षेत्रांत महिला उत्तुंग भरारी घेत आहेत. प्रत्येक महिलेचे प्रश्न वेगवेगळे आहेत; पण त्यांना न घाबरता, नव्या दमाने, ताकदीने त्यास भिडायचे आहे. तालुक्‍यातील कुठलीही महिला किंवा युवती असू द्या; तिच्या पाठीशी मी भक्कम उभी आहे.''

विविध गीतांवर ठेका धरीत कोल्हे यांनी नृत्य करताना महिलांना आरोग्याविषयी जागरूक राहण्याची सूचना केली. त्या म्हणाल्या, "बळकट शरीरासाठी कसरती आवश्‍यक आहेत. संसाराचा गाडा ओढताना कुटुंबातील महिला स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करते; मात्र अन्य सदस्यांची काळजी घेते. तिने इतरांबरोबर स्वतःच्याही तब्येतीची काळजी घेणे आवश्‍यक आहे. आपण महिला म्हणून जीवन जगू तोपर्यंत प्रश्न, संघर्ष आपल्या वाटेला आलेला असेल; मात्र संघर्षाला न घाबरता, न डगमगता सामोरे गेले पाहिजे. जगात आज सर्वच क्षेत्रांत महिला आपला नावलौकिक वाढवीत असताना, तालुक्‍यातील महिलेने कुठेही मागे पडू नये. महिला सक्षमीकरणासाठी आमदार होण्याच्या आधीपासून बचतगटाची चळवळ सुरू केली. त्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व आर्थिक दर्जा निश्‍चित सुधारला.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT