नगर

प्रसंगी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय माझाच : डाॅ. सुजय विखे पाटील

सरकारनामा ब्युरो

नगर : ''नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी मी निवडणूक लढवावी, ही कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. मागील दोन वर्षांपासून मी त्यासाठी प्रचार सुरू केलेला आहे. राष्ट्रवादीने जागा सोडली नाही, तरी मी अपक्ष लढणारच आहे. त्यात माझ्या आई-वडिलांच्या भूमिकेचा संबंध नाही. हा निर्णय केवळ माझाच आहे,'' असा पुनरुच्चार काँग्रेसचे युवा नेते डाॅ. सुजय विखे पाटील यांनी केला.

अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपले राजकीय धोरण पुन्हा स्पष्ट केले. यापूर्वीही ठीकठिकाणी कार्यक्रमांतून त्यांनी आपण प्रसंगी अपक्ष लढू, अशी घोषणा केली होती. त्याचा पुनरुच्चार करीत डाॅ. विखे पाटील म्हणाले, "नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तेथील नेते आपल्या संपर्कात आहेत. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून ठिकठिकाणी शिबिरे भरवून लाखो लोकांना वैद्यकीय मदत करता आली. या दरम्यान अनेक प्रश्न दिसून आले. त्यामुळे लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणीही येवू लागली." ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असली, तरी आपण प्रसंगी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहोत. त्याची तयारीही झाली असल्याचे डाॅ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

एमआयडीसी हवी दहशतमुक्त
नगरची औद्योगिक वसाहत दहशतीमुक्त हवी. त्यासाठी आपण प्रयत्न करू. नगरला चांगले उद्योग आल्यास हजारो युवकांना रोजगार, नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. आधी हा परिसर दहशतमुक्त करावा लागेल, असे डाॅ. विखे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT