Kirit Somaiya interacting with workers at the Parner Cooperative Sugar Factory premises martand buchude
नगर

मला देशाची काळजी - किरीट सोमय्या

पारनेर सहकारी साखर कारखाना बचाव समितीने नुकतीच दिल्ली ( Delhi ) येथे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड ( Dr. Bhagwat karad ) व ईडीचे मुख्य संचालक संजय मिश्रा ( Sanjay Mishra ) यांची दिल्ली येथे भेट घेतली होती.

मार्तंड बुचुडे

पारनेर, ता. 23 ः पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करावी अशी मागणी कारखाना बचाव समितीने सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) केली आहे. पारनेर कारखाना बचाव समितीच्या प्रतिनिधींनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड व ईडीचे मुख्य संचालक संजय मिश्रा यांची दिल्ली येथे भेट घेऊन ही मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर खासदार किरीट सोमय्या आज पारनेर कारखाना (क्रांती शुगर) भेट देण्यासाठी आले आहेत.

पारनेर कारखाना बचाव समितीने कारखाना विक्रीनंतर लगेचच यातील गैरव्यवहाराची तक्रार केली होती. क्रांती शुगरकडे पैसे नसतानाही 32 कोटी रूपयांना हा कारखाना कसा विकत घेतला. तसेच राज्य सहकारी बँकेने कारखाना विक्रीची बोगस प्रक्रिया राबविला असल्याचा आक्षेप बचाव समितीने घेतला आहे. या कारखाना विक्रीतील भ्रष्टाचार बाबत औरंगाबाद खंडपीठात तीन याचिका दाखल आहेत. या बाबत समितीने पंतप्रधान कार्यालय व केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडेही तक्रार दाखल केली आहे.

दिल्ली येथे बचाव समितीने समाजसेवक माणिक जाधव व भारतीय जनता पक्षचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची भेट घेतली होती. त्या वेळी सोमय्या यांनी कारखान्याचे सभासद व शेतकरी यांच्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहे असे आश्वासन दिले होते. त्या नुसार सोमय्या हे आज (गुरूवारी) पारनेरला आले आहेत.

खासदार सोमय्या यांनी आज कारखान्याला भेट दिली. त्यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री बाळा भेगडे, विश्वनाथ कोरडे, कारखाना बचाव कृती समितीचे बबन कवात, रामदास घावटे, साहेबराव मोरे आदी होते.

यावेळी सोमय्या यांनी कामगार व शेतकऱ्यांशी संवाद साधला. कामगांनी कारखाना बंद होऊ देऊ नका. आमचा उदर निर्वाह त्यावर असल्याचे गाऱ्हाणे मांडले. कामगार नेते शिवाजी औटींनी माहिती दिली की, दर महिन्याचे 67 लाख रूपयांचे पगार निघतात. 25 वर्षांपासून कामगार काम करत आहेत. कारखाना बंद झाला तर उपासमारीची वेळ येऊ शकते. कारखाना सुरु राहण्यासाठी जेलभरो आंदोलन केले होते. कामगार आयुक्त कार्यालयात आंदोलने केली. आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे, असे औटींनी सांगितले.

यावर खासदार सोमय्या म्हणाले, कारखान्याच्या संचालकांनी पैसे खाण्यासाठी क्रांती शुगरचे नाव वापरले आहे. पण कारखाना बंदचा प्रश्न येणार नाही. त्याची शाश्वती देण्यासाठी मी येथे आलो आहे. मला देशाची काळजी आहे. परंतु ज्यांनी लबाडी केली त्यांची चौकशी झाली पाहिजे, असेही सोमय्या यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT