jamkhed sabhapati issue
jamkhed sabhapati issue  
नगर

जामखेडमध्ये सभापतीपदाच्या आरक्षणासाठी उमेदवारच नाही

सरकारनामा ब्युरो

नगर : जामखेड येथील पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी निश्‍चित झाले, परंतु एकही सदस्य या प्रवर्गाचा नसल्याने चांगलेच त्रांगडे निर्माण झाले. जिल्हा प्रशासनाने तातडीने ग्रामविकास खात्याकडे याबाबत मार्गदर्शन मागविले आहे.  

जिल्ह्यातील 14 पंचायत समिती सभापती पदांच्या आगामी काळातील आरक्षणाची सोडत नुकतीच पार पडली. याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राद्वारे ग्रामविकास विभागाने मागील आठवड्यात जारी केली होती. आज (शुक्रवारी) जामखेड पंचायत समितीतील विद्यमान सदस्य डॉ. भगवानराव मुरूमकर, राजश्री मोरे, मनीषा सुरवसे, सुभाष आव्हाड यांची नावे प्रवर्गासह नोंदवीत पुढील मार्गदर्शनाचा प्रस्ताव ग्रामविकास खात्याकडे रवाना करण्यात आला आहे. यावर निर्देश प्राप्त झाल्यानंतर आता पुढील प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांनी दिली.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT