नगर

4 कोतकर तुरुंगात 1 तुरुंगाबाहेर; निवडणुकीत कुणीच नाही!

या कटुंबातील एकही सदस्य रिंगणात नाही.

सरकारनामा ब्युरो

नगर : एकेकाळी भानुदास कोतकर याच्या कुटुंबियांव्यतिरिक्त कोणत्याही निवडणुकीत कोणीही विरोधात रिंगणात येवू शकत नव्हते. या वेळच्या महापालिकेच्या निवडणुकीत मात्र प्रथम या कटुंबातील एकही सदस्य रिंगणात नाही. भानुदास कोतकरसह तिनही मुले तुरुंगात असून स्नुषाही फरार आहे.  

महापालिकेच्या सर्व निवडणुकांत केडगावमधूनच नव्हे, तर नगर शहरातही तत्कालिन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर याचे वर्चस्व होते. केडगावमधून तर इतर कोणीही सहजासहजी डोके वर काढत नव्हते. अशोक लांडे खून प्रकरणात अडकल्यामुळे कोतकरसह तिनही मुले तुरुंगात गेली. मागील पंचवार्षिक निवडणुकीत केडगावमधील प्रभागांत आपले वर्चस्व सिद्ध करण्यात भानुदास कोतकरच्या स्नूषा सुवर्णा कोतकर यशस्वी झाल्या. परंतु केडगाव दुहेरी हत्याकांडात त्यांनाही फरार होण्याची वेळ आली. साहजिकच या निवडणुकीत हे कुटूंब निवडणुकीपासून दूर राहिले. ही पहिलीच अशी निवडणूक आहे, की ज्यामध्ये संबंधित कुटुंबाचा सहभाग नाही.

दरम्यान, भानुदास कोतकरांची काँग्रेस संपविण्यात भाजप नेते यशस्वी झाले आहेत. काँग्रेस पक्षाकडून कोतकर समर्थकांनी व त्यांच्या आप्तेष्ठांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत उमेदवारी करण्याची तयारी केली. परंतु एका रात्रीत राजकीय उलथापालथ होवून हे सर्वच उमेदवार थेट भाजपच्या कळपात दाखल झाले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT