MLA Rohit Pawar meets Minister Shankarrao Gadakh sarkarnama
नगर

आमदार रोहित पवारांनी आणला तुकाई योजनेच्या कामासाठी मोठा निधी

कर्जत ( Karjat ) तालुक्यातील 28 गावांसाठी तुकाई उपसा सिंचन योजनेत आमदार रोहित पवार ( MLA Rohit Pawar ) यांच्या प्रयत्नातून आता आणखी 4 अतिरिक्त पाझर तलावांचा ( lake ) सामावेश करण्यात आला आहे.

नीलेश दिवटे

कर्जत : कर्जत-जामखेड मतदार संघाचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने आमदार रोहित पवार प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी केंद्र व राज्यातील मंत्र्यांच्या गाठीभेटी घेऊन मतदार संघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.

कर्जत तालुक्यातील 28 गावांसाठी जीवनदायिनी असलेल्या तुकाई उपसा सिंचन योजनेत आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून आता आणखी 4 अतिरिक्त पाझर तलावांचा सामावेश करण्यात आला आहे. या कामासाठी 3 कोटी 55 लाख रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या बाबत त्यांनी मुंबईत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता अखेर त्याला यश आले आहे.

कर्जत तालुक्यातील तुकाई सिंचन योजनेअंतर्गत अवर्षण प्रवण क्षेत्रातील एकूण 20 पाझर तलाव व 3 लघूपाटबंधारे योजनांमध्ये पाणी सोडण्याचे व तलाव भरून देण्याचे व त्यानंतर या पाणी साठ्याचा पिण्यासाठी व सिंचनासाठी या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र या सिंचन योजनेवर अवलंबून असणाऱ्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा विचार करता या योजनेत आणखी वाढीव पाझर तलावांचा सामावेश व्हावा यासाठी आमदार रोहित पवार यांचे प्रयत्न सुरू होते.

या योजनेत मागील शासनाच्या काळात गोयकरवाडी, खंडाळा, वाघनळी, चांदे बुद्रुक येथील चार पाझर तलावांचा समावेश करण्यात आलेला नव्हता ही बाब तेथील नागरिकांनी आमदार पवार यांच्या निदर्शनास आणून दिली व नागरिकांची मागणी लक्षात घेत त्यांनी तातडीने 29 जानेवारी 2020 रोजी शासनास पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला.मंत्रिमंडळाच्या 'मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्यासमवेत ही बैठक घेण्यात आली होती. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी संबंधित गावांचा सामावेश करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

त्या अनुषंगाने प्रादेशिक जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग नाशिक यांनी शासनास 22 जुलै 2020 रोजी शासनास सुधारित प्रस्ताव सादर केला.आता चारही गावांचा पाझर तलावात समावेश झाला आहे. मुळात तुकाई सिंचन योजना शेती सिंचनासाठी पुरेशी ठरणारी नसली तरी ही योजना आहे. या स्थितीत पूर्णत्वास जावी व योजनेतून काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना मदत व्हावी असा अट्टाहास आमदार पवार यांचा राहिलेला आहे.

हे करत असताना आणखी काही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आणता येतील का? याबाबत त्यांचा प्रयत्न सुरू आहे. या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेल्या एकूण मूळ 20 पाझर तलाव व 3 लघू पाटबंधारे तलाव या पाटबंधारे योजनांमध्ये अतिरिक्त वाढीव 4 पाझर तलावांचा सामावेश झाल्याने आता या पाझर तलावांची संख्या 24 झाली आहे. या उपसा सिंचन योजनेंतर्गत तब्बल 599 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

तुकाई सिंचन योजनेत वाढीव गावांचा सामावेश व्हावा यासाठी मी राज्यशासनाकडे विनंती करून पाठपुरावा केला. त्यानंतर त्याबाबतचा सर्व्हे देखील करण्यात आला. तुकाई योजनेच्या पाईपलाईनच्या क्षमतेनुसार संबंधित वाढीव गावांचा सामावेश झाला. या वाढीव तलावांचा योजनेत सामावेश होऊन हा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख आदींनी उपलब्ध करून दिला आहे.

- रोहित पवार, आमदार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT