The traffic police in Pune took a photo with MLA Rohit Pawar MLA Rohit Pawar facebook post
नगर

आमदार रोहित पवार यांना आला पोलिसांचा असा अनुभव

पोलिसांच्या ( police ) या अनुभवाचे आमदार रोहित पवार ( MLA Rohit Pawar ) यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत.

Amit Awari

अहमदनगर : वाहन चालवत असताना कधीकधी वाहतूक पोलिस आपल्याला अडवतात. लायसन व इतर कागद पत्रे विचारतात, ट्रॅफिक सिग्नल तोडला तर दंड करतात. वाहतूक पोलिसांची वाहनचालकांच्या मनात भीती असते. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या हे स्वराज्य ध्वज उभारणी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रण देण्यासाठी गाठीभेटी घेत आहेत. या निमित्त ते पुण्यात आले होते. 2019मध्ये वाहतूक पोलिसांनी रोहित पवार यांना दंड केला होता. तेच पोलिस पुन्हा आमदार रोहित पवार यांना भेटले आणि जे घडले याचा पोलिसांच्या ( police ) या अनुभवाचे आमदार रोहित पवार ( MLA Rohit Pawar ) यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत.

आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, वाहतूक पोलिस नेहमीच दंडाची पावती फाडतात, असा तुमचा समज असेल तर तो गैरसमज आहे. दररोज शेकडो लोकांना तोंड देणाऱ्या या कर्मचाऱ्यांकडून अचानक तुम्हाला कौतुकाचीही पावती मिळू शकते. मलाही काल असाच अनुभव आला.

वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या काही पोलिस कर्मचाऱ्यांची काल पुण्यात एका ठिकाणी भेट झाली. यावेळी सोबत फोटो काढायची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याने आम्ही फोटो काढला. त्यातील एका कर्मचाऱ्याने मे 2019 मध्ये माझ्या गाडीवर दंड आकारला होता. ती घटना मी विसरूनही गेलो होतो, पण त्या कर्मचाऱ्याने त्या घटनेची आठवण काढली आणि तुम्ही आमदार नसताना तेंव्हाचा स्वभाव आणि आताचा स्वभाव यात काहीच फरक नसल्याचं सांगत दंडाची नाही तर चांगल्या वर्तणुकीची पावती दिली. वाहतूक पोलिसाकडून मिळालेलं हे 'प्रमाणपत्र' पाहून मलाही सुखद धक्का बसला.

ऊन, थंडी, पाऊस याची कोणतीही पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी 12-12 तास रस्त्यावर उभं राहून कर्तव्य बजावणाऱ्या या पोलिस कर्मचाऱ्यांबाबत मला नेहमीच आदर वाटत आला आहे. नागरिकांनीही हुज्जत न घालता या कर्मचाऱ्यांना नेहमी सहकार्य करावं, असं आवाहनही आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

आमदार रोहित पवार यांच्या या पोस्टमुळे महाराष्ट्र पोलिसांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. सलग 12 तास काम करणाऱ्या वाहतूक पोलिसांनाकडे नागरिकांचा दृष्टीकोन बदलण्यास ही पोस्ट महत्त्वाची ठरत आहे. रोहित पवार यांनी पोलिसांसमवेत काढलेला फोटो आज जोरदार व्हायरल होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT