नगर

दशक्रियाविधीदिवशी केलेला निर्धार सेनानेते खरा करुन दाखवतील काय? 

सरकारनामा ब्युरो

नगर : शिवसैनिकांवरील हल्ल्याची ही राज्यातील पहिलीची घटना आहे. संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोन्ही कार्यकर्ते शिवसेनेचे निस्सीम कार्यकर्ते होते. पक्ष त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिल. यापुढे शिवसैनिकांवरील अन्याय कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, हत्या करणारांना कठोर शासन झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी ग्वाही शिवसेनेचे बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

केडगाव येथील शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांचा दशक्रिया विधी आज झाला. या वेळी शिवसेनेचे मंत्री शिंदे यांच्यासह राज्यमंत्री दादासाहेब भुसे उपस्थित होते. स्थानिक पदाधिकारी व अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

मंत्री शिंदे यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त करीत कोतकर व ठुबे या दोन्ही कुटुंबाच्या मागे शिवसेना भक्कमपणे उभी आहे, असे सांगितले. संबंधित कुटुंबियांनी मंत्र्यांसमोर आपली कैफियत व्यक्त करून आरोपींना फाशीच झाली पाहिजे, अशी मागणी केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT