नगर

आमदार संग्राम जगताप यांचा कारागृहातील मुक्काम वाढला

सरकारनामा ब्युरो

नगर :  केडगाव येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हत्येप्रकरणी पोलिस कोठडी मिळालेले राष्ट्रवादी काॅग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह भानुदास कोतकरबाळासाहेब कोतकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

केडगाव येथे शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीया गुन्ह्यात फिर्यादीनुसार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापभानुदास कोतकरबाळासाहेब कोतकर यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली होतीआज यातील तिघांना  न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने न्यायालयीने कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यानया गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करायचे असूनतिनही आरोपींची कोठडीची मुदत राखीव ठेवून त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावीअशी मागणी तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी केलीप्रथम वर्ग न्यायालयाने पोलिस कोठडीची मुदत राखून ठेवत तिनही आरोपींना न्यायालयीने कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

दरम्यानकाल कैलास गिरवले यांच्या अंत्यविधीसाठी आमदार संग्राम जगताप पोलिस कोठडीत असताना न्यायालयाची खास परवानगी घेऊन आले होतेअत्यंत कडक पोलिस बंदोबस्तात त्यांना आणण्यात आले

गिरवले यांच्या मृत्यूची चाैकशी करावीअशी मागणी करीत त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांशी संवाद साधलातसेच अमरधाम येथे अत्यंत कडक बंदोबस्तात त्यांनी हजेरी लावून गिरवले यांना निरोप दिलाआता जगताप यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याने त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT