नगर

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला बबनराव पाचपुते गैरहजर! 

सरकारनामा ब्युरो

नगर : कृषी महाविद्यालय श्रीगोंद्यावरून जामखेडला नेल्याने भाजप नेते बबनराव पाचपुते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले. दरम्यान, जामखेडप्रमाणे श्रीगोंद्यालाही कृषी महाविद्यालय करण्याची घोषणा करत फडणवीसांनी तोडगा काढला आहे. 

हळगाव (ता. जामखेड) येथे आज कृषी महाविद्यालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या वेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार दिलीप गांधी उपस्थित होते. नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी श्रीगोंद्यालाही कृषी महाविद्यालय देऊ, असे सांगून समझोता घालण्याचा प्रयत्न केला असला तरी पाचपुते व त्यांचे समर्थक नाराजच असल्याचे दिसून आले. 

निळवंडे धरण व कालव्यांसाठी पाचशे कोटी कोटींचा निधी देऊ, याबाबत मंत्रालयात लवकरच निर्णय होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT