नगर

SP रंजनकुमार शर्मा यांचा इशारा; समाजकंटकांवर कडक कारवाई करणार! 

सरकारनामा ब्युरो

नगर : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या दगडफेक व तोडफोडीचे पडसाद आज नगरमध्ये पडले. जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. नगर शहरात माळीवाडा भागात किरकोळ दगडफेक झाली. श्रीरामपूरमध्ये चारचाकी जाळली. तेथे शंभर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आवश्‍यक तेथे चोख बंदोबस्त असून, नागरिकांनी कायद्याचे उल्लंघन करू नये. समाजकंटकांवर कडक कारवाई केली जाईल. शांतता राखण्यासाठी जनतेने सहकार्य करावे. कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सरकारनामा शी बोलताना व्यक्त केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT