MLA Nitesh Rane sarkarnama
नगर

Nagar BJP News : कार्यकर्त्याच्या चिठ्ठीवर नितेश राणे म्हणाले, मी चिठ्ठीवाला नाही रे...

Umesh Bambare-Patil

-राजेंद्र त्रिमुखे

Nagar BJP News : राहुरी इथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित जनआक्रोश मोर्चात आमदार नितेश राणे यांनी आक्रमक आणि जोरदार भाषण केले. भाषणांत ते नेहमी प्रमाणे विविध मुद्दे आवेशपूर्ण मांडत असताना एका कार्यकर्त्याने त्यांना चिठ्ठी आणून दिली. मात्र चिठ्ठी कदाचित मोठी असल्याने चिठ्ठीवर नजर टाकत, "एव्हढा वाचायला लागलो असतो तर ग्रॅज्युएट झालो असतो" असे मार्मिकपणे म्हणत "मी चिठ्ठीवाला नाही रे" म्हणताच एकच हशा उडाला.

राहुरी तालुक्यातील उंबरे गावात काही अल्पवयीन मुलींना बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. याच्या निषेधार्थ आज (पाच ऑगस्ट) सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चाचे Hindu Jan Akrosh Morcha आयोजन केले होते. मोर्चानंतर झालेल्या सभेत आमदार राणे Nitesh Rane यांनी आपल्या नेहमीच्या खास शैलीत पोलीस-प्रशासनावर टोलेबाजी करत वाढत्या लव्ह जिहाद, धर्मांतरणाच्या प्रकारांबद्दल जाब विचारला.

आमदार राणे यांचे भाषण सुरू असतानाच श्रीराम सेनेचे सागर बेग यांनी एका चिठ्ठीवर काही मुद्दे त्यांच्यासमोर दिले. त्यावर नजर टाकत मुद्दा कदाचित विस्तृत लिहिलेला दिसताच आमदार राणे यांनी, "एव्हढं वाचायला लागलो असतो तर ग्रॅज्युएट झालो असतो. मी चिठ्ठीवाला नाही रे.., वाचून-बिचून अभ्यास करून बोलणारा व्हाईट कॉलर नाही मी" असे म्हणताच सभेत उपस्थितांत हशा उडाला.

आता आमदार राणे यांनी चिठ्ठीच्या निमित्ताने केलेली कोटी नेमकी कुणासाठी होती, हे मात्र कळू शकले नाही. मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री आमचा आहे. त्यामुळे पोलिसांनी उगाच आमच्यावर सिंघमगिरी करू नये. उगाच वाकड्या केसेस करू नका असे म्हणत सुनावले.

आमदार राणे यांनी यानिमित्ताने आपल्या भाषणात श्रीरामपूर विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांचे नाव घेत कुणाच्या सांगण्यावरून चुकीची कारवाई करताल तर तुम्हाला कोण वाचवायला येणार असेही बजावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT