people of shevgaon in tension due to corona virus
people of shevgaon in tension due to corona virus 
नगर

शेवगावमध्ये धाकधुकी : परदेशी नागरिकांच्या एका गटाचे तालुक्यात वास्तव्य

सरकारनामा ब्युरो

शेवगाव (नगर): दिल्लीतील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या 29 परदेशी नागरिकांपैकी एक गट अमरापूरसह शेवगाव शहरात वास्तवास असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेवगावकरांचे धाबे दणाणले आहे.

नागरिकांच्या एका गटाने मुकुंदनगर व जामखेड येथे वास्तव्य केले होते. त्यांतील अनेक जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दुसऱ्या गटाच्या शेवगाव कनेक्‍शनमुळे तालुक्‍यातही कोरोना संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. पोलिस प्रशासनासह आरोग्य विभागाने संबंधितांच्या संपर्कातील लोकांची यादी करण्यास सुरवात केली आहे. हे नागरिक कुठे, किती काळ वास्तव्यास होते, कोणाकोणाच्या संपर्कात आले, याची माहिती गोळा करण्यात येत आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन 29 परदेशी नागरिकांचे दोन गट जिल्ह्यात रेल्वेने आले. त्यांतील एक गट नगरमधील सर्जेपुरा येथून कोल्हारला, नंतर राहुरीतून अमरापूरला आला. तेथून शेवगावात एके ठिकाणी थांबून नेवाशाला गेल्याचे उघड झाले आहे. त्यांना अमरापूर व शेवगावात कोणी आश्रय दिला, ते कोणाकोणाच्या संपर्कात आले, तसेच त्यांच्याही संपर्कात नंतर अनेक स्थानिक गावकरी आले असण्याचा धोका आहे.

संपर्कातील व्यक्तींवर लक्ष ठेवणार
नागरिकांचा हा गट 19 मार्चच्या दरम्यान तालुक्‍यात वास्तवास होता. त्याला 14 दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतर रोगाची लागण होण्याचा व संपर्काच्या दक्षतेचा कालावधी संपुष्टात आला आहे. मात्र, तरी संबंधितांच्या संपर्कातील व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांनी दिली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT