prajakta-tanpure
prajakta-tanpure 
नगर

राज्यमंत्री तनपुरेंनी केली वैद्यकीय अधिकाऱ्याची कानउघाडणी

सरकारनामा ब्युरो

राहुरी (नगर) : वांबोरी येथे ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी हजर नाहीत, रुग्णांची हेळसांड होते, या तक्रारींची शहानिशा केल्यावर नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे संतापले. नगर येथे घराकडे निघालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मागे बोलावून, तनपुरे यांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

राज्यमंत्री तनपुरे यांनी वांबोरी ग्रामीण रुग्णालयास अचानक भेट दिली. त्यामुळे रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तारांबळ झाली.

वांबोरी ग्रामीण रुग्णालयासाठी अद्ययावत इमारत व सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत.  रुग्णालयासाठी पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती आहे. रुग्णालय परिसरात वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवासस्थान आहे, परंतु ते नगर येथे राहतात. सकाळी ओपीडी करून पुन्हा जातात. रुग्णांना ऍडमिट करून घेतले जात नाही. गरजेच्या वेळी गोरगरिबांना वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नाही, अशा तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या. 

कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने ग्रामीण रुग्णालय उभारले. सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु रुग्णांना वेळेवर सेवा मिळत नाही. या रुग्णालयात ज्यांची नेमणूक आहे, त्यांनी थांबले पाहिजे. रुग्णांना पूर्णवेळ सेवा मिळाली पाहिजे, असे तनपुरे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाठक यांना सांगितले. 

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, वांबोरीचे माजी सरपंच नितीन बाफना, संभाजी मोरे, बंटी वेताळ हे यावेळी उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT