prajakta tanpure
prajakta tanpure 
नगर

रोहितदादांबाबतची भुमिका पक्षश्रेष्ठींना सांगितली होती!

सरकारनामा ब्युरो

राहुरी (नगर) :  रोहितदादा पवार मंत्रिपदासाठी आग्रही असतील तर मी स्पर्धेत नाही. ते इच्छुक नसतील तर माझा विचार व्हावा, असे पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. जिल्ह्यात मंत्रिपदावरून कुणाचीही नाराजी नाही," असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

राहुरी येथे नागरी सत्कारप्रंगी तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी गोविंद मोकाटे होते.
तनपुरे म्हणाले, "राहुरी- नगर-पाथर्डी मतदार संघातील पंधरा वर्षांचा विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून वांबोरी चारीच्या थकित वीज बिलासाठी दीड कोटी व देखभाल दुरुस्तीसाठी पन्नास लाख रुपये मंजूर करून घेतले आहेत. राहुरी पालिकेच्या पाणी योजनेस भाजपा सरकारने तत्त्वतः मंजुरी दिली होती. 'तत्त्वतः' शब्द वगळून, योजनेस गती देण्यासाठी मंत्रालयात बैठक बोलावली आहे. राहुरी बसस्थानकातील प्रश्नावर एस.टी. च्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे.  राहुरी ग्रामीण रुग्णालयाची इमारत, वांबोरी व भागडा योजनांचे प्रश्न, निळवंडे कालव्यांची कामे, राहुरी लघु औद्योगिक वसाहतीत पायाभूत सुविधा व विकास कामे अशी वर्षानुवर्षे प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्राधान्य दिले जाईल."

तनपुरे म्हणाले, "विधानसभा निवडणुकीत स्व. शिवाजी गाडे यांचे शेतकरी मंडळ ताकदीने पाठीशी राहिले. ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांनी मदत केली. अस्मितेच्या मुद्द्यावर तालुका एकवटला. भरभरून प्रेम दिले. हे कधीही विसरू शकणार नाही. निवडून आल्यावर विरोधात बसण्याची तयारी केली होती. परंतु, महाविकास आघाडीमुळे सत्ताधारी गटातून राज्यमंत्रीपदी कामाची संधी मिळाली. सत्तेचा वापर कुणाची मस्ती जिरवण्यासाठी करणार नाही. तर, पक्ष संघटना वाढवून, तळागाळातील माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी करील."
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT