balasaheb_thorat_radhakrishna_vikhe_patil.
balasaheb_thorat_radhakrishna_vikhe_patil. 
नगर

राधाकृष्ण विखे म्हणतात , हा थोरातांचा नैतिक पराभव !

सरकारनामा

श्रीरामपूर (नगर), :  " राज्यात कॉंग्रेसची अवस्था दयनीय झाली असून, नगर जिल्ह्यात कॉंग्रेसने 12 पैकीफक्त  तीन उमेदवार उभे केले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा हा नैतिक पराभव आहे. निवडणुकीच्या लढाईत नगर जिल्ह्यात 12 विरुद्ध शून्य करण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत,'' असा निर्धार गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज व्यक्त केला.

शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सभा बुधवारी (ता. 9) होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शहरात महायुतीतील नेत्यांसह कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विखे पाटील बोलत होते.

ते म्हणाले, "केंद्रात पंतप्रधान मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे सुरू आहेत. कार्यकर्त्यांसह जनतेमध्ये विकासाची भावना आहे. उद्या सीमोल्लंघनानिमित्त आगामी विधानसभेत मोठा जनाधार मिळविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.''

जनतेत भाजप सरकारविषयी विश्‍वास आहे. शहरांसह ग्रामीण विकासासाठी मोठा निधी आणण्याचा ध्यास घेतला असून, व्यवसाय, रोजगारनिर्मिती, तरुणांसाठी कौशल्य देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी नगर जिल्ह्यात लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेसाठी महत्त्वाच्या जागांवरील बंडखोरी रोखण्यात भाजपला यश मिळाल्याचेही विखे यांनी सांगितले.

पाटपाण्याचा प्रश्‍न निसर्गावर अवलंबून असतो. यंदा जायकवाडी धरण भरल्याने अतिरिक्त पाणी सोडण्याचा प्रश्‍न येत नाही. केंद्र सरकारकडे कांदा निर्यात धोरणाबाबत विनंती केली आहे. शेतकऱ्यांना कांदा होर्डिंगमध्ये फायदा होत नाही. त्यात ग्राहकांचेही नुकसान होते. सरकार लवकरच शेतकऱ्यांना आणि ग्राहकांनाही दिलासा देणारा निर्णय घेणार आहे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

शिंदे यांचाच विजय
"राष्ट्रवादी कॉंग्रेसने दक्षिणेत केलेले वातावरण अवास्तव असून, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचाच विजय होईल. लोकांमध्ये स्थित्यंतराची भूमिका पोचविण्यासाठी वेळ लागतो. कोण कुणाला पाठिंबा देते काही कळत नाही. उमेदवाराबद्दल काही आक्षेप आहेत. तो विरोध व्यक्तिकेंद्रित आहे. मतभेद मिटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. श्रीरामपूरचे लोक आपल्या हक्काचा माणूस निवडून देतील,'' असेही विखे पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT