नगर

कमळाला मत म्हणजे सुबत्तेला मत : राधाकृष्ण विखे

सरकारनामा ब्युरो

राहाता (नगर) : कमळाला मत म्हणजे आपल्या सुबत्तेला व प्रगतीला मत आहे. या सकारात्मक भावनेतून जनता येथून विक्रमी मताधिक्‍य देणार आहे, असा विश्‍वास भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

मतदारसंघातील अस्तगाव येथे आज झालेल्या जाहीर प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते.

विखे पाटील म्हणाले, "युती सरकार हे काम करणारे सरकार आहे. कॉंग्रेस आघाडीचे सरकार माझी अडवणूक करणारे सरकार होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तत्कालीन मंत्र्यांच्या मनात माझ्याविषयी द्वेष व असूया होती. या द्वेषातून त्यांनी एक लाख सभासद असलेली मुळा-प्रवरा वीज संस्था बरखास्त करून कामगारांना देशोधडीला लावले. शिर्डी विधानसभा मतदारसंघ विकासाचे मॉडेल आहे. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ मिळाल्याने, पुढील दोन वर्षांत मतदारसंघातील सर्व कामे मार्गी लागतील.''

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, "कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तत्कालीन मंत्री आमच्या कामाच्या फायली फेकून द्यायचे. दोन-दोन तास तिष्ठत ठेवायचे. भाजपचे उमेदवार व गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विक्रमी मताधिक्‍य देऊन या अपप्रवृत्तींना शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनता धडा शिकवील.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT