पाथर्डी : नगरपलिकेच्या उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे गटेनेते नंदकुमार शेळके यांची निवड झाली. राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्षपदाच्या उमेदवार सविता भापकर यांचा शेळके यांनी नऊ मतांनी पराभव केला. पालिकेत आमदार मोनिका राजळे यांचे प्राबल्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
प्रांत अधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात आज दुपारी बैठक झाली. उपनगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने नंदकुमार शेळके यांनी, तर राष्ट्रवादीच्या वतीने सविता भापकर यांना अर्ज दाखल केले होते.
भाजपाचे पालिकेत बारा नगरसवेक व नगराध्यक्ष असे तेरा सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाच सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश बोरुडे अनुपस्थीत होते. विधानसभा निवडणुकीपुर्वीच बोरुडे यांची भाजपाशी जवळीक वाढलेली आहे. आज झालेल्या निवडणुकीत शेळके यांना तेरा, तर भापकर यांना चार मते मिळाली. नऊ मताधिक्याने शेळके विजयी झाले.
डॉ. मृत्युंजय गर्जे, नामदेव लबडे, बजरंग घोडके, प्रविण राजगुरु, रमेश गोरे, सुनिता बुचकुल, मंगल कोकाटे, दीपाली बंग, संगिता गट्टाणी, शारदा हंडाळ, प्रसाद आव्हाड, दुर्गा भगत, आशिया मणियार, सविता डोमकावळे, माधुरी आंधळे उपस्थीत होते. निवडीनंतर शेळके यांचा गौरव करण्यात आला.
`राष्ट्रवादी'ची मागणी फेटाळली
उपनगराध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानाने घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली. हे मतदान हात उंचावुन (हात वर करुन) करण्याची तरतुद कायद्यानुसार आहे. त्यामुळे अशी परवानगी देता येणार नसल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी सांगितले. मतदान हात उंचावूनच घेण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.