Ram_Shinde
Ram_Shinde 
नगर

मला कॅबिनेटची पुन्हा संधी ः प्रा. राम शिंदे

सरकारनामा

नगर :  गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांमुळे मला चांगली साथ आहे. कामाची पावती म्हणून मी पुन्हा मताधिक्याने निवडून येणार असून, मला कॅबिनेटची पुन्हा संधी मिळणार आहे. मागील दाैऱ्यात मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणाही केली होती, असा विश्वास पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.

शिंदे यांनी आज त्यांच्या गावी चाैंडी येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. या वेळी बोलताना ते म्हणाले, कर्जत-जामखेड मतदारसंघात धनाड्य शक्तीला जनता थारा देणार नाही. आपला तो आपलाच आणि परका तो परकाच असतो. त्यामुळे जनतेने मला मोठी साथ दिली आहे. मतदारसंघातील जनता मला पुन्हा आर्शिर्वाद देतील. माझा विजय निश्चित आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेत केलेल्या घोषणेप्रमाणे ते मला मंत्रीमंडळात पुन्हा स्थान देणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT