Ram-shinde-777
Ram-shinde-777 
नगर

तर, राम शिंदेंना  बांगड्यांचा आहेर : माधव गडदे

सरकारनामा

नगर :  "धनगर समाजाच्या ताकदीमुळेच राम शिंदे मंत्री झाले. धनगर आरक्षणाचे आश्‍वासन सरकार पाळत नाहीच; उलट चौंडीतील कार्यक्रमानंतर समाजातील तरुणांवर अन्याय सुरू आहे. पालकमंत्री शिंदे यांच्या सांगण्यावरूनच पोलिसांनी समाजातील तरुणांवर गुन्हे दाखल केले. हे गुन्हे मागे न घेतल्यास यशवंत सेनेच्या महिला शिंदे यांना बांगड्यांचा आहेर देतील,'' असा इशारा यशवंत सेनेचे सरसेनापती माधव गडदे यांनी आज दिला.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला 15 दिवसांत आरक्षण देण्याचे आश्‍वासन भाजप नेत्यांनी दिले होते; मात्र अजूनही ते पाळलेले नाही. यशवंत सेनेच्या आंदोलनानंतर उलट शिंदे यांना कॅबिनेटपदी बढती मिळाली, याचा त्यांनी विचार करावा. आरक्षण मागणे, समाजाचा गुन्हा आहे का? चौंडीतील कार्यक्रमात दगड कोणी मारले, याचा तपास न करता केवळ शिंदे यांनी आकसापोटी समाजातील तरुणांवर गुन्हे दाखल करायला लावले.''
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT