नगर

'आमदार' रोहित पवारांचे फ्लेक्स झळकले, शिंदेंचे टेन्शन वाढले!

सरकारनामा ब्युरो

नगर : कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या विजयाचा फ्लेस आज कर्जत येथे उभारले आहेत. ते फ्लेक्स लगेचच झाकून ठेवण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. तथापि, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उद्याची तयारी आजचकेली आहे. मतदारसंघात रोहित पवार यांच्या विजयाचे फ्लेक्स लावण्यास सुरुवात केली असून, उभारलेला फ्लेक्स लगेच झाकून ठेवला जात आहे. उद्या ते विजयी होतीलच, असा आत्मविश्वास बाळगून निकाल लागला की लगेचच वरचा पडदा हटवायचा, ऐवढेच बाकी ठेवले आहे. या प्रकारामुळे भाजपचे राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ सुरू झाली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT