-राजेंद्र त्रिमुखे
Nagar MIDC News : कर्जत शहरात आमदार रोहित पवार समर्थक एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यात कळीचा मुद्दा ठरलेला कर्जत तालुक्यातील अधिसूचनेच्या प्रतीक्षेत असलेला एमआयडीसीचा देखावा तयार केला आहे. गणेशोत्सव धार्मिक उत्सव असला तरी या देखाव्याच्या निमित्ताने पवार-शिंदे राजकीय वादाचा वास या देखाव्यातून गणेश भक्तांना येत आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात होणाऱ्या पाटेगाव-खंडाळा एमआयडीसी MIDC वरून विधानसभेच्या गेल्या दोन्ही अधिवेशनात आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी रणकंदन माजवले. एमआयडीसीला आमदार राम शिंदे, रोहित पवार यांच्यासह सरकारचा पाठिंबा असला तरी जंग-जंग पछाडूनही उद्योगमंत्री उदय सामंत Uday Samant यांच्याकडून अधिसूचना निघालीच नाही.
त्यानंतर एकंदरीत रोहित पवार यांनी कर्जत एमआयडीसीचा विषय राजकीय आणि वैयक्तिक प्रतिष्ठेचा केला असेच दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवात कर्जत शहरातील मृत्युंजय ग्रुप व आमदार रोहितदादा पवार मित्र मंडळाच्या नियोजित एमआयडीसीचा आकर्षक देखावा तयार केला असून, या देखाव्याची जिल्ह्यात जोरदार राजकीय चर्चा होत आहे.
दरम्यान, मतदारसंघातील युवांना रोजगार मिळावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करून आमदार रोहित पवार यांनी एमआयडीसी मंजूर करून आणली. याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहितीदेखील नागरिकांना मिळावी, यासाठी तीदेखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. एमआयडीसीची माहिती त्याबरोबरच त्यासाठी सुरुवातीपासून आमदार रोहित पवार यांनी कशा पद्धतीने पाठपुरावा करून ती मंजूर करून आणली, याचा लेखाजोखा सविस्तरपणे मांडल्याचे मृत्युंजय ग्रुपच्या वतीने सांगण्यात येत आहे.
Edited By Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.