BRS Agitation Nagar sarkarnama
नगर

Nagar News : थकीत देणी प्रकरणी बीआरएस आक्रमक; पाचपुतेंसह तहसीलदारांना काळे फासणार

Tilak Bhos शेतकरी, कामगार, वाहतूकदार यांची देणी ही काही कोटींची असल्याचा आरोप भारत राष्ट्र समितीचे श्रीगोंदा तालुका समन्वयक टिळक भोस यांनी करत पाचपुते यांनी देणी द्यावी, यासाठी आंदोलन सुरू केले आहे.

Umesh Bambare-Patil

Nagar BRS News : भाजप आमदार बबनराव पाचपुते यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते यांची भागीदारी मालकी असलेल्या साखर कारखान्याच्या थकीत देणीप्रकरणी बीआरएस पक्षाचे श्रीगोंदा मतदारसंघ समनव्यक टिळक भोस यांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे. तीन दिवस उलटूनही पाचपुते यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत आता आक्रमक भूमिका घेतली आहे. विक्रम पचपुतेंसह सहकार्य न करणाऱ्या तहसीलदारांना काळे फासण्याचा इशारा श्री. भोस यांनी दिला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील साईकृपा खाजगी सहकारी साखर कारखान्याच्या संभावित विक्रीच्या अनुषंगाने आता जुने देणे संदर्भात भारत राष्ट्र समितीच्या BRS वतीने सोमवारपासून आंदोलन सुरू आहे. तरी विक्रमसिंह पाचपुते Vikramsinh Pachpute यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत बीआरएसचे समन्वयक भोस यांनी थेट तहसीलदार यांच्या दालनात आंदोलक शेतकरी, कामगारांसह जात काळे फासण्याचा इशारा दिला आहे. या बाबतचा एक व्हिडिओ भोस यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे.

यावेळी तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी विक्रमसिंह पाचपुते देणी देण्याबाबत लेखी माहिती देणार असल्याचे आंदोलकांना सांगितले. विक्रमसिंह पाचपुते त्याचबरोबर अन्य दोन भागीदारांसह कारखाना सुरू आहे. मात्र या कारखान्याची विक्री होणार असल्याची माहिती तालुक्यात आहे.

त्यामुळे यापूर्वी केलेल्या कामांची देणे त्यामध्ये शेतकरी, कामगार, वाहतूकदार यांची देणे ही काही कोटींची असल्याचा आरोप भारत राष्ट्र समितीचे श्रीगोंदा तालुका समन्वयक टिळक भोस यांनी करत पाचपुते यांनी देणी द्यावी, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे.

पाचपुते कुटुंब कारखाना वैयक्तिक असल्याने विकण्यास आमचा विरोध नाही मात्र वर्षानुवर्ष या कारखान्यात काम केलेले कामगार, शेतकऱ्यांनी दिलेला ऊस, आणि वाहतूकदारांचा खर्च या सर्व गोष्टींची देणे या कारखान्याचे मालक आणि त्यांचे भागीदार यांनी त्वरित अदा करावीत अशी मुख्य मागणी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT