Shalini Vikhe Patil - Balasaheb Thorat
Shalini Vikhe Patil - Balasaheb Thorat 
नगर

विधानसभा निवडणूक २०१९ : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरांतांविरोधात शालिनी विखे लढणार?

हर्षल भदाणे पाटील

कोपरगाव मतदारसंघ
कोपरगाव मतदारसंघातून सध्या भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांचा पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी आशा आहे. तथापि, विखे पाटील यंचे मेहुणे राजेश परजणे यांनीही लढण्याची तयारी केली आहे.

      स्नेहलता कोल्हे

त्यामुळे कोल्हे यांच्या उमेदवारीला धोका असल्याचे मानले जाते. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे माजी आमदार अशोक काळे यांचे चिरंजीव आशुतोष काळे प्रबळ दावेदार आहेत. कॉंग्रेसमधून प्रमोद लबडे तसेच शिवसेनेतर्फे राजेंद्र झावरे व नितीन औताडे दावेदार आहेत. नरेंद्र मोदी विचार मंचतर्फे नगराध्यक्ष विजय वहाडणे दावेदार आहेत. वहाडणे यांनी भाजपच्या मुलाखतींना हजेरी लावली असल्याने त्याकडेही लक्ष्य लागले आहे.

अकोले मतदारसंघ

           वैभव पिचड

अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे आमदार वैभव पिचड अलिकडेच भाजपमध्ये दाखल झाले. त्यांची उमेदवारी निश्‍चित असल्याने येथून भाजपतर्फे लढण्यास इच्छूक असलेल्या अशोक भांगरे व त्यांच्या पत्नी सुनिता भांगरे यांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे त्यांनी विरोधकांची फळी उभी करुन पिचड यांच्या विरोधात एकच उमेदवार देण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे. राष्ट्रवादीतर्फे डॉ. किरण लहामटे व शिवसेनेतर्फे मधुकर तळपाडे तसेच मारुती मेंगाळ येथून लढण्याची तयारी करत होते. मात्र, पिचड भाजपमध्ये दाखल झाल्यापासून त्यांच्या विरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी ही मंडळी एकत्र आली आहेत.

संगमनेर मतदारसंघ
संगमनेर मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष, आमदार बाळासाहेब थोरात नेतृत्व करत आहेत. त्यांच्याशी तगडी लढत देईल, असा नेता सध्या तरी विरोधकांकडे नाही. त्यामुळे थोरात यांच्या विरोधात भाजपतर्फे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे पाटील यांनीच लढत द्यावी, असा भाजपतर्फे आग्रह आहे.

     आबासाहेब थोरात

कॉंग्रेस आघाडीच्या जागा वाटपात ही जागा कॉंग्रेसच्या कोट्यात असली तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आबासाहेब थोरात येथून इच्छूक आहेत. शिवसेनेतर्फे जनार्दन आहेर व बाबासाहेब कुटे देखील इच्छुकांच्या रांगेत आहेत. आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की, कुठल्या मतदार संघात कुणाची वर्णी लागते? आणि कोण निवडून येतं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT