नगर

नगर शहर झोपडपट्टीमुक्त करू : जगताप

सरकारनामा ब्युरो

नगर :  आर्थिक दुर्बल घटकांना घरकुले उपलब्ध करून 2024 पर्यंत नगर शहर झोपडपट्टीमुक्त करू, असा विश्‍वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.

जगताप यांनी माऊली सभागृहात मागील पाच वर्षांतील विकासकामे व 2024 पर्यंतचा जाहीरनामा जनतेसमोर ठेवला.

ते म्हणाले, ऐतिहासिक वारसा जतन करून पर्यटनाला चालना दिली जाईल. कॉंक्रिटीकरण, डिजिटल कनेक्‍टिव्हिटी वाढविण्यासाठी शहरात फ्री वाय-फाय झोन केला जाईल. जिल्हा रुग्णालयात सुसज्ज असे 200 बेड, तसेच प्रसूतिगृहाचा दर्जा उंचावला जाईल. पथदिव्यांसाठी सौरऊर्जेचा वापर केला जाईल. चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. वाचनालय, दहा हजार महिलांना गृहउद्योगातून रोजगार दिला जाईल. सीना नदीपात्राचे संवर्धन, सुशोभीकरण करण्यात येणार आहे. भिंगारमध्ये 15 एकरांत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडासंकुल उभारण्यात येईल. नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न राहील. आयटी पार्कच्या माध्यमातून नऊ हजारांहून अधिक युवकांना रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे अर्थव्यवस्थेत वार्षिक 162 कोटींची उलाढाल होणार आहे. स्टार्ट-अपसाठी 50 कोटींची गुंतवणूक आणली जाईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT