second corona patient from ahmadnagar is now negative
second corona patient from ahmadnagar is now negative 
नगर

नगरमध्ये दुसऱ्या रूग्णाला मिळणार डिस्चार्ज 

सरकारनामा ब्युरो

नगर : नगरमध्ये पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता दुसऱ्या रुग्णालाही कोरोना होऊन 14 दिवस पूर्ण झाले आहेत. त्याचा स्त्राव अहवाल निगेटिव्ह आला असून, पुन्हा एक स्त्राव तपासणीसाठी आज पाठविला आहे. त्याचा अहवालही निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी पाठविणार आहेत. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढून नगरकरांना धडकी भरली असताना रुग्ण बरे होत असल्याचा दिलासाही मिळत आहे.

जिल्ह्यात सर्वात आधी कोरोनाग्रस्त असल्याबाबतचा अहवाल आलेल्या रुग्णाला चौदा दिवसांनंतर घरी सोडून होम क्वारंटाईन केले आहे. त्याची प्रकृतीही ठणठणीत आहे. आता दुसऱ्या रुग्णाचाही 14 दिवसानंतर केलेल्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता चोवीस तासांची चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी पाठविण्यात येणार आहे. तसेच त्याला होम क्वारंटाईन केले जाईल. त्याचीही प्रकृती ठणठणीत आहे. इतर 15 कोरोनोबाधितांपैकी बहुतेकांची प्रकृती चांगली आहे. योग्य औषधे व चांगला आहार घेतल्याने रुग्ण बरे होत आहेत. 

आणखी अडीचशे बेडची सोय
कोरोनाबाधितांना बुथ हॉस्पिटलच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. आगामी काळात रुग्ण ठेवण्याची अडचण येवू नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घेत बडीसाजन मंगल कार्यालय, शासकीय महाविद्यालय या ठिकाणी 250 बेडची व्यवस्था केली जाणार आहे. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या व्हेंटीलेटर व्यतिरिक्त आणखी सहा व्हेंटीलेटर मागविण्याचा प्रस्ताव प्रशासनाने पाठविला आहे. त्यामुळे आगामी काळात रुग्ण वाढल्यास त्यांना तातडीने उपचार मिळण्यासाठी पुरेपुर व्यवस्था प्रशासनाने केली आहे.

काल सापडलेले रुग्ण संगमनेर व जामखेडमधील आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यांमध्ये पोलिसांनी अधिक कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. रस्त्यावर दिसेल त्याला फटके दिले जात आहेत. तसेच गाड्यांची हवा सोडून देवून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT