नगर : राष्ट्रवादी काॅग्रेसचा नगर येथील मेळावा संपल्यानंतर व्यासपीठाजवळ मला आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. तोच प्रकार माजी महापाैर अभिषेक कळमकर यांच्याशी झाला. कोतवाली पोलिस ठाण्यात जगताप-कळमकर यांच्यात चर्चा होऊन सेटलमेंट झाली, त्यात माझा सहभाग नाही, असा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत केला.
काळे म्हणाले, धक्काबुक्कींतर मी कसाबसा बाहेर आलो. तेच कार्यकर्ते कळमकर यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करीत होते. मी त्यांच्या मदतीसाठी गेलो असता पोलिसांनी आम्हाला मोटारीत बसविले. तक्रार देण्यासाठी थेट ठाण्यात गोलो. तेथे ज्येष्ठ नेते दादा कळमकर आणि आमदार संग्राम जगताप आले.
त्यांनी पोलिस ठाण्यातच बंद खोलीत चर्चा केली. त्यानंतर जगताप व कळमकर यांच्यात काय सेटलमेंट झाली, याची माहिती नाही. ते दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असा आरोप काळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.