shivaji kardile on zp president election
shivaji kardile on zp president election 
नगर

नगर झेडपीचा अध्यक्ष भाजपचाच होणार!

सरकारनामा ब्युरो

नगर : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम लवकरच होणार आहे. या आखाड्यात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी उडी घेतली आहे. "आगामी अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचाच होणार आहे. पक्षाने एकजुटीने प्रयत्न केल्यास हे शक्‍य आहे,' असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे.  

राहुरीच्या डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी कारखान्यासंदर्भात जिल्हा बॅंकेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज आयोजित पत्रकार परिषदेनंतर कर्डिले बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षाची मुदत संपली आहे. ग्रामविकास विभागातर्फे शनिवारी (ता. 21) अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी नोटीस जारी होणार आहे. त्यानंतर दहा दिवसांनी निवडप्रक्रिया पूर्ण होईल. राजकीय पक्षांकडून त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

मागील आठवड्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत भूमिका स्पष्ट केली. नव्याने अस्तित्वात आलेल्या शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडीचाच अध्यक्ष होणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. हे सर्व घडत असताना भाजपतर्फे भूमिका स्पष्ट करण्यात आली नव्हती. मात्र, कर्डिले यांनी प्रथमच त्याबाबत भाष्य केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT