shivaji kardile on zp president election 
नगर

शालिनी विखे नाही, कमळाचाच अध्यक्ष होणार: शिवाजी कर्डिले 

राधाकृष्ण विखे यांच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे. या संदर्भातील चौकशी येत्या दोन महिन्यात होऊन चौकशीच्या अहवालानुसार कारवाई होणार आहे.

सरकारनामा ब्युरो

नगर : आमचे काम चांगले असतानाही विधानसभेत पराभवाला सामोरे जावे लागले. याबाबत जिल्ह्यातील भाजपच्या पराभूत उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींपुढे आपले म्हणणे मांडले आहे. त्याची चौकशी होऊन दोन महिन्यांत निर्णय होईल. तोपर्यंत आमची नाराजी दूर झाली, असे म्हणता येणार नाही, असे मत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केले. 

जिल्हा परिषदेच्या निवडींबाबत आज भाजपच्या स्थानिक कमिटीची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कर्डिले यांनी विखे पाटील व इतर पराभूत आमदारांच्या वादाबाबत वक्तव्य केले. 

कर्डिले म्हणाले, जिल्ह्यातील पराभूत आमदारांनी आपले म्हणणे कोअर कमिटीसमोर मांडले आहे. माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे. या संदर्भातील चौकशी येत्या दोन महिन्यात होऊन चौकशीच्या अहवालानुसार कारवाई होणार आहे. सर्वांनी आपले म्हणणे मांडले असले, तरी नाराजांची नाराजी कायम आहे.` 

चौकशीच्या प्रक्रियेबाबत कर्डिले म्हणाले, आमचा पराभव कसा झाला व कोणामुळे झाला, हे सर्व मुद्दे मुंबईत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मांडलेले आहेत. निवडणुकीच्या काळात मतदारांमध्ये जाऊन सर्व्हे केला जातो, तसेच चौकशी करताना प्रत्यक्ष मतदार संघात जाऊन मतदारांची मते जाणून घेऊन मगच कारवाई करावी, असा मुद्दाही नाराज आमदारांनी या वेळी मांडलेला आहे. 

मुंबईत झालेल्या या बैठकिला राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते. ही चर्चा समोरासमोर झाली असून, आम्ही आमचे मुद्दे श्रेष्ठींसमोर मांडले आहेत. त्यांनीही त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. या संदर्भात दोन्ही बाजूचे म्हणणे विरोधी पक्ष नेत्यांनी ऐकूण घेतलेले असून, त्यावर येत्या दोन महिन्यांत चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे, असे कर्डिले यांनी सांगितले.
 
जिल्हा परिषदेत सध्या शालिनी विखे पाटील या अध्यक्ष आहेत. त्या अधिकृतपणे काँग्रेसमध्येच आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना कर्डिले यांनी बोलताना भाजपचा उमेदवार हा कमळाच्याच चिन्हावर निवडून आलेला असेल, असे स्पष्ट केले. त्यामुळे शालिनी विखे पाटील यांची अध्यक्ष होण्याची शक्‍यता मावळली असल्याचे स्पष्ट होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT